Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

*विशाळगड येथील मशिदीची व दर्ग्याची तोडफोड आणि बोध.*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला,*

  *सांगली

कोल्हापूर मधील 550 वर्ष जुन्या असणाऱ्या आणि हजारो लोकांचे "श्रद्धास्थान" असणाऱ्या सुप्रसिद्ध रेहानबाबा दर्गा आणि मस्जिदची "अतिरेकी मनुवाद्यांच्या " बगलबच्यांनी" तोडफोफ करत "विध्वंस" केला. 

ज्या रेहानबाबांनी आपल्या घोड्याच्या टाचेवर जमिनीतून पाणी काढून दाखवले, जनतेला त्रास देणाऱ्या एका कोकणमधील जादूगार ला मारले , तुम्ही अशा या "जागृत" असणाऱ्या दर्ग्याची तोडफोड करता ???

ज्या मशिदीने कोरोना आणि महापूर मध्ये "सर्वधर्मिय" जनतेला "आसरा" दिला, ज्या मशिदीतून दररोज शेकडो जेवणाचे डबे माझ्या हिंदूबांधवांना घरपोच होत होते , ती "माणुसकीची भिंत" तुम्ही आज पाडली ??? छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदी बांधल्या ,त्या कधीही "पाडल्या" नाहीत .आणि त्यांचे "नावं" घेऊन तुम्ही मशिदीची "तोडफोड" करता ???

सावधान , 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडली त्या बलबीरला ज्यांनी महंमद अमीर करून दाखवले त्या परमेश्वराच्या कोपाचा सामना आता सर्वधर्मसमभाव पायदळी तुडवणाऱ्या आणि "जातीयवाद" पसरवणार्यांना करावा लागणार आहे .अयोध्या -बद्रीनाथमध्ये भाजपा "पराभूत" झाली .देवाच्या नावाने "माणुसकी" नष्ट करणारे "राजकारण" करणार्यांना प्रभू श्रीराम यांनीही "नाकारले" आहे हें सिद्ध होते .आता महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीत हें सिद्ध होणार हें निश्चित ! कारण मशिदीला हात लावणे म्हणजे "आत्मघात" करण्यासारखे असते .असो ,



   बाबरी मशीद पाडणारा बनला महंमद आमीर !


ज्या बलबीरने बाबरीच्या "घुमज" वर चढून भगवा झेंडा फडकवला, जो बाबरी पाडण्यासाठी "अग्रभागी" होता तो काही दिवसानंतर मुस्लिम झाला . मशीद पडल्यामुळे घरात आई वडिलांनी घराबाहेर काढले, मेल्यानंतर "तोंड" पाहायचे नाही असे बजावले, दारोदार हिंडत आत्मचिंतन करत बलबीरने प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला. मदरसा मध्ये जाऊन त्याने बाबरीची कबुली दिली .व "मुस्लिमधर्म" स्वीकारणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुस्लिम झाल्यानंतर त्याची पत्नीदेखील मुस्लिम झाली . प्रायश्चित म्हणून आतापर्यंत त्याने 50 मशिदीची "उभारणी" केली आहे .त्याच्या तोंडात एकच शब्द असतो ..तो म्हणजे शांती, सर्वधर्मसमभाव !

14 तारखेला जातीयवाद्यांनी "विशाळगडाच्या"+ मशिदीवर देखील मिनार तोडण्याचा प्रयत्न केला ,आणि झेंडा फडकवला,आता त्यांचे भविष्यात काय होणार ???

   विकासकामाचे अपयश झाकण्यासाठी "हिंदुकार्ड " खेळण्याचा मनसुबा* 



आगामी विधानसभेत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे पानिपत होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. विकासकामांचे "अपयश" झाकण्यासाठी आणि मराठा मतांची बेगमी करण्यासाठी हिंदुकार्ड खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. पोलीसप्रशासनाची संदिग्ध भूमिका आणि हजारो लोकांचा समूह चाल करणार हें माहित असताना केलेली डोळेझाक ,आणि सरकारची मूकसंमती यामुळेच विशाळगड येथे मस्जिद आणि दर्ग्याची तोंडफोड झाली का ???

मस्जिद आणि दर्ग्याकडे "वक्रदृष्टी" म्हणजे आत्मघात आणि नुकसान हें विधिलिखित आहे. या अतिरेकी कृत्यात "स्थानिक" कोणीही नव्हते. आता या तोडफोड मधील बाहेरून आलेल्यांपैकी किती माथेफिरू प्रायश्चित म्हणून नवमुस्लिम होणार ??? याचे उत्तर "काळच" देईल.                     

             

.*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा