*उपसंपादक----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
नवी दिल्ली :----भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टॅग संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फास्टॅग खिशात ठेवणे किंवा गाडीच्याब इतर कोणत्याही भागावर चिकटवल्यास कारवाई केली जाईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विंडशील्डवर व्यवस्थितपणे फास्टॅग लावले नसल्यास, तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. फास्टॅग विंडशील्डव्यतिरिक्त इतर कुठेही चिकटवल्याने स्कॅनिंगमध्ये समस्या निर्माण होतात. यामुळे अनेक वेळा इतर वाहनांना थांबावे लागते. ही गोष्ट टाळण्यासाठी प्राधिकरण दुप्पट टोल आकारणार आहे.
गाडीच्या समोरच्या विंडशील्डवर फास्टॅग चिकटवलेले नसल्यास दुप्पट वापरकर्ता शुल्क वसूल करण्यासाठी, एनएचएआयने सर्व वापरकर्ता शुल्क संकलन संस्थांना मानक कार्यप्रणाली (SoP) जारी केली आहे. तसेच, सर्व टोल नाक्यांवर महामार्ग वापरकर्त्यांना, समोरच्या विंडशील्डवर निश्चित फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दल दंडाबद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय, विंडशील्डवर व्यवस्थित न लावलेल्या फास्टॅग प्रकरणांची नोंद, त्या गाड्यांच्या वाहन नोंदणी क्रमांक (VRN) सोबत केली जाईल. यामुळे आकारले जाणारे शुल्क आणि टोल लेनमध्ये वाहनाची उपस्थिती याबाबत योग्य रेकॉर्ड ठेवण्यास मदत होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा