--- इंदापूर तालुक्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नियुक्ती केल्याचे २९ जुलै रोजी एका आदेशाच्या आधारे काढले आहेत.
आमदार भरणे यांच्यासह एकूण ११ सदस्य या समितीचे कामकाज पाहणार आहेत. यापूर्वी आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर तसेच गावोगावी या योजनेसाठी शिबिरे आयोजित केली होती. तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र शिबिरे गावोगावी भरवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे. समितीच्या अध्यक्षपदी आमदार दत्तात्रय भरणे यांची निवड झाल्याने तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा