Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जुलै, २०२४

*सांगलीचा आवाज लोकसभेत घुमला आणि भेदभाव करणाऱ्या सरकारला चांगलाच धुतला*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *सांगली ----पञकार*

   *मो.8983 587 160


गेल्या 10 वर्षांपासून सांगलीचे नावं लोकसभेत अपवादात्मक पाहावयास मिळत असताना सांगलीतील काँग्रेसचे नूतन खासदार "विशाल प्रकाशबापू पाटील " यांनी सांगलीच्या विकासाबाबत पोटतिडकीने बोलत "प्रश्नांची" मालिका उपस्थित करत लोकसभा गाजवली. सांगलीकरांनी दिलेले "मत" आज सार्थकी झाल्याचे समाधान सर्वांना झाले.

नवखे असूनही आपल्या स्वतःच्या मतदारसंघातील "म्हैशाळ - टेम्भू" योजना , सांगलीची स्मार्ट सिटी आणि कवलापूर विमानतळ मतदारसंघाबाबत "न्याय" मागताना संपूर्ण महाराष्ट्राला " बजेट " मध्ये झुकते मापं न दिल्याबाबत त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या. महाराष्ट्रात ,सांगली - कोल्हापूर मध्ये महापूर येतो,त्यासाठी केंद्रसरकारकडे "निधी" नाही परंतु उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यांसाठी निधी आहे.हा भेदभाव नाही का ?? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .

भेदभाव कराल तर आगामी महाराष्ट्र ,हरियाणा आणि झारखंड मधील निवडणुकांमध्ये लोकसभेप्रमाणे भाजपचा सुफडासाफ होणार असल्याचे ठासून सांगितले.

चंद्रबाबू नायडूंच्या आंध्रप्रदेश साठी 15000 कोटी आणि महाराष्ट्रासाठी कोणताही निधी का नाही ??? हा देखील प्रश्न त्यांनी व्यक्त केला. 

कुबड्यावरील सरकार "मनमानी" करत आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

गेल्या कित्येक वर्षात सांगलीचे नावं लोकसभेत दिसलें नव्हते. परंतु विशाल पाटील यांनी ही उणीव भरून काढली.

अपक्ष निवडनुक लढवणाऱ्या विशाल पाटील यांना सांगलीकरांनी भरभरून "मते" दिली त्या मतांची 1000% परतफेड "विशाल पाटील करत आहेत ही समाधानाची बाब आहे .


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार*)

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा