*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता. तुळजापूर येथे "शिक्षण सप्ताह "या महा उपक्रमांतर्गत आज सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रिती भोजन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गावातील दानशूर प्रतिष्ठित व्यक्ती, शिवाजी महादेव खंडागळे यांनी 10 हजार रुपयांची देणगी देऊन गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ बाळेश्वर विद्यालय बारूळ प्रियदर्शनी प्राथमिक शाळा बारूळ या तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना भोजन दिले या भोजनाच्या उपक्रमासाठी गावातील सर्व नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलाणी ए.जे.यांनी विद्यार्थ्यांना या आहाराचे महत्त्व जीवनामध्ये काय असते याचे महत्त्व समजावून सांगितले.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिले. या जेवणामध्ये विविध पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या, सुकामेवा इ . पदार्थाचा समावेश होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी महादेव खंडागळे यांनी 10 हजार रुपयांचे देणगी देऊन आजच्या या उपक्रमासाठी मोलाची मदत केली त्या बाबत शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मुख्याध्यापक शेख एस .एम, मुलाणी ए.जे ,पवार बी.टी ,मोरे एन . एस,गडेकर आर.सी ,जाधव एस. के ,चव्हाण के.एच वाघमारे, राजगुरू एम. आर त्याचप्रमाणे स्वयंपाकी मदतनीस ,गावातील महिला यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा