*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"मी कोल्हापुरातील मौलाना, धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो. ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते. मुस्लिमांनी दोन-दोन तास ऊनात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं.
मुस्लिमांनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान केलं. त्याचं मुस्लिमांना फळ काय मिळालं? तर विशाळगडावर जे घडलं ते त्याचं त्यांना फळ मिळालय. तेथे तोडफोड करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली. लोक हातात तलवार घेऊन फिरत होते, पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. या सर्वाचं नेतृत्व कोण करत होतं? जे स्वत:ला शाहू महाराजांचे वंशज म्हणवतात. मी संभाजी महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तकं दिले होते. मी आपल्याला होत जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा. संभाजी महाराज कोण होते? शाहू महाराज कोण होते? त्या शाहू महाराजांचे आपण वंशज असाल तर कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही?", असा सवाल छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. विशालगडावर हिंसाचार झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ कुठे गेले, कुठं लपून छपून बसले होते? बंटी पाटील कुठे आहेत?
इम्तियाज जलील म्हणाले, माझा मुस्लीम समाजाला थेट प्रश्न आहे. मशीदीचा मेंबर पण जळालेला आहे. मौलवी साहेब जिथे उभे राहून नमाज अदा करतात, ते सुद्धा जळालेलं आहे. आमच्या विरोधात तुम्ही खूप बोलतात. मग आज तुमच्याकडे काय उत्तर आहे? हसन मुश्रीफ कुठे गेले, कुठं लपून छपून बसले होते? बंटी पाटील कुठे आहेत? हे मुस्लीम समाजापुढे मतदानासाठी भीक मागत होते. तुम्हाला मुस्लिम समाजाने मतदान केलंय.
विशाळगडावरील हिंसाचारानंतर शाहू महाराज काय काय म्हणाले?
विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू छत्रपती यांनी दिली आहे. शाहू महाराज यांनी पत्रक प्रसिद्धीस देताना संभाजीराजेंच्या भूमिकेचा निषेध केला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो, असे शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा