Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

कंदर या.करमाळा येथील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भक्तगणाचे श्रद्धास्थान सुफी संत हजरत सय्यद शहानुरशाह साहेब (नाना) यांच्या ऊरुसास येत्या रविवारपासून प्रारंभ

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



मानवतेचा संदेश देणाऱ्या सुफी संताचे  ऊरूस व यात्रा ही भारतीय संस्कृतीची एक फार जुनी परंपरा आहे ती परंपरा आजही जोपासली जात आहे अशा या मानवते चा संदेश देणाऱ्या ऊरूसात व यात्रेत राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडते हजारो भाविक आणि श्रद्धाळू धर्म, जात, पंथ, वर्ण अशा प्रकारचे सर्व भेद विसरून ऊरुसामध्ये एकत्र येतात भाविकांना येथे कोणीही बोलावीत नाही अथवा निमंत्रण देत नाही तेथे पाहुणचार केला जात नाही आपला पैसा व वेळ खर्च करून भाविक या ठिकाणी एकत्र येत असतात 



भाविकांना असेच आकर्षित करणाऱ्या करमाळा तालुक्यातील कंदर येथील हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक व जागरूक देवस्थान देखील करमाळा टेंभुर्णी या महामार्गावर आहे करमाळा तालुक्यातील या महामार्गावरील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे सुफी संत हजरत सय्यद शहानुरशाह साहेब नाना यांचा दर्गाह होय 

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कंदर येथे हजरत सय्यद शहानुरशाह साहेब यांचा ऊरुस येत्या 19 एप्रिल पासून प्रारंभ होणार असून दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी संध्याकाळी नऊ वाजता कंदर येथील जहागीरदार गल्ली मधून संदल चा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये मिरवणुकीने सदरचा संदल दर्गा या ठिकाणी पोहोचणार आहे याशिवाय दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सोमवारी चार वाजता बारा गाड्या ओढण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच 21 एप्रिल 2026 मंगळवार रोजी भव्य कुस्त्यांचा आखाडा याशिवाय रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्ट तसेच कंदर ग्रामस्थ यांनी केले आहे


चौकट घेणे 

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन तसेच सर्व धर्म समभावाचा संदेश

करमाळा तालुक्यातील कंदर येथील जागृत देवस्थान हजरत सय्यद शहानुरशाह साहेब नाना यांच्या संदल उरूस तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव देखील खांद्याला खांदा लावून सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेच्या वातावरणात पार पाडतात आप आपसातील वैराची भावना मिटवून सर्वजण आपण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असा संदेश देत कंदर गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव सदर धार्मिक कार्यक्रम एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने मोठ्या भक्ती भावमय रीतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील सदरचा धार्मिक उपक्रम हिंदू मुस्लिम एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा