Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० एप्रिल, २०२६

*शेतकऱ्यांची पाणंद रस्त्याची मागणी पाहता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना होणे गरजेचे* - *आमदार नारायण आबा पाटील*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांची पाणंद रस्त्याची मागणी पाहता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याची अपेक्षा आमदार नारायण (आबा) पाटील यांनी व्यक्त केली. करमाळा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.


मातोश्री ग्राम समृध्दी शेत व पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालूकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा जि सोलापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे होते तर कुर्डुवाडी-माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) जयश्री आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. करमाळा तालूक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या नियोजनातुन हि बैठक पार पडली. यावेळी माढा तालुक्याचे तहसिलदार संजय संजय भोसले तसेच तसेच सार्वजनिक बांधकाम,महसूल,भूमीअभिलेख, पंचायत समिती,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आदिनाथ कारखान्याचे संचालक देवानंद बागल, संचालक राजाभाऊ कदम, रविकिरण फुके, पंचायत समिती सदस्य अतुलभाऊ पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय शिरस्कर, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, जयदरथ शिंदे, आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय फडतरे, सुर्यकांत पाटील आदिसह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक व महसुल अधिकारी तथा तलाठी उपस्थित होते.

यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रशासनाला काही सुचना दिल्या.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की  मतदारसंघातील प्रत्येक गावात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याबाबत आढावा घेण्यात याव्यात.तसेच गावातील ग्रामपंचायत सरपंच यांनी पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन त्या-त्या गावचे रस्ते अतिक्रमण काढणे,रस्ते नकाशावर घेणे,चालू रस्ते पहाणे,शेतकऱ्यांनी बंद केलेले रस्ते पुन्हा चालू करणेसाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना  करण्यात याव्यात.तसेच पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेण्याचे नियोजन करण्यात येईल. कोणत्याही गावातील शेतकरी रस्त्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना आमदार पाटील यांनी केली..

--------------


चौकट

मातोश्री ग्राम समृध्दी शेत व पाणंद रस्ते योजना आढावा बैठकीनंतर आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या परिसरात नियोजित नुतन प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी आरक्षित केलेल्या जागेची पाहणी केली. या पुर्वी नवीन प्रशासकीय इमारत ही करमाळा शहराच्यापासुन दुर बांधण्याचे नियोजन केले गेले होते परंतु आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यावेळी यास विरोध करुन शहराच्या सोयीने आहे त्याच ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याची मागणी केली होती. यामुळे आज आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वतः या नियोजित व आरक्षित जागेची पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा