*अकलूज-- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज्याच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९५ वी जयंती विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरी केली.
सकाळी महादेव मंदिरामध्ये बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती राजकुमार गुळवे व सौ.राजश्री गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आली तर बसवेश्वर चौकातील उत्सव मुर्तीचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक विलास क्षीरसागर यांनी पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील,अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील,माजी सरपंच पांडुरंगभाऊ देशमुख,अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ.रेश्माताई अडगळे व त्यांचे पती लालासाहेब अडगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच माळशिरस तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेच्या बसवेश्वर महाराज यांना अभिवादन करण्यात आले तर अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात शिव शक्ती संघटनेच्या वतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.
दुपारी चार वाजता रथात आरूढ झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीचे पूजन सोमनाथ कथले व सौ.तेजश्री कथले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेळापूर येथील बृहन्मठ मठाधीपती श्री.ष.ब्र.१०८ सद् गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी, अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील,सौ.शितलदेवी मोहिते-पाटील,ह्दयरोग तज्ञ डॉ.एम. के.इनामदार यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले.त्यानंतर अकलूज शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.यामध्ये महात्मा बसवेश्वर ढोल ताशा पथकांनी आपली कला सादर केली.यामध्ये महिला व पुरुषांबरोबर लहान मुले ही सहभागी झाले होते.शिवनिर्णय संघटना लेझीम संघाने लेझीम पारंपरिक खेळ सादर केला, तरूणींनी तलवार बाजी,लाठी काठी खेळाचे प्रत्यक्षिक केले तर या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विविध वेशभूषेत सहभागी झालेली लहान मुले होती.यामध्ये जेजुरीचा खंडोबा,सकाळच्या पहारीचा वासुदेव,घोड्यावर आरुढ झालेले महात्म्य बसवेश्वर महाराज खास आकर्षण होत.या मिरवणुकीत विरशैव लिंगायत समाजातील पुरूष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महादेव मंदिर येथे येथे या मिरवणुकीचा सांगता झाली व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज संचालक मंडळ व समाज बांधवांनी खूप परिश्रम घेतले.
*चौकट*
सायंकाळी मिरवणुक सदुभाऊ चौकात आल्या नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली.भर पावसात ही ढोल ताशा पथकातील पुरूष व महिला वर्गांनी ढोल ताशा वाजविण्याच्या आनंदा बरोबर पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत मिरवणुक पुर्ण केली.
*बसवेश्वर महाराज यांना👆👆 कोटी कोटी प्रणाम...!*
अकलूज येथे जगज्योती बसवेश्वर महाराज यांची ४९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या छायाचित्रात हि दोन लहान मुले हात जोडून बसवेश्वर वंदन करीत आहेत






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा