इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे ११ जुलैला येणार आहे. महाराजांच्या पादुकांना तीनशे वर्षाच्या परंपरेप्रमाणे नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. नैऋत्य मौसमी पावसाने सुरूवातीलाच हजेरी लावल्याने नदीत पाणी आल्याने पादुकांचे नीरा स्नान होणार असल्याने वारकरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी ( ता. इंदापूर ) येथे मुक्कामी पालखी गुरूवार ११ जुलैला येणार आहे. परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठावर मुक्काम असल्याने पालखीतील लाखो वैष्णवांच्या अंघोळीची सोय व्हावी तसेच महाराजांच्या पादुकांना नदीच्या पाण्याने स्नान घालण्याच्या दृष्टीने मुक्काम केला जातो. शुक्रवार १२ जुलैला पादुकांच्या निरा स्नानानंतर सकाळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे पालखी मार्गस्थ होणार आहे.
मागील अनेक वर्षात निसर्गाने अवकृपा केल्याने नीरा नदी सतत कोरडी पडत होती. त्यामुळे पादुकांचे नीरा स्नान सलगपणे टॅकरच्या पाण्याने केले जात आहे. यावर कायमस्वरुपी उपाय योजना आखण्याचा मानस पालखी काळात प्रशासनाकडून केला जातो. परंतू पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पुढील वर्षीच पादुका स्नानावेळी सर्वांना जाग येते. ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याने वारकरी व भक्तांत नाराजीचा सुर निघत आहे. यावर्षी निसर्गानेच निरा स्नानाची तयारी केली आहे.
नीरा नदीतून पालखीतील लाखो वैष्णवांना सहजरित्या पार करता यावा यासाठी बंधारा कम रस्ता करण्यात आला आहे. यावर्षी बंधाऱ्यावरील स्लॅबवर काॅक्रीट टाकण्यात आले असून दुतर्फा असणारे कठडेही तुटलेले आहेत. पाटबंधारे विभाग प्रतीवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करतात. परंतू नीरा नदी ओलांडताना कोणाला ईजा होऊ नये यासाठी संरक्षक लोखंडी ग्रील उभारणी का करत नाहीत. तर बंधाऱ्या लगत नदीपर्यत जायला सिमेंटचा रस्ता करण्यात आला. परंतू नदीत पादुकांना स्नान घालण्यासाठी सिंमेंटचा कठडा अथवा ओठा करण्यात आला नाही. प्रत्येक वर्षी शेवाळलेल्या पाण्यात उभा राहून अंघोळ घालण्याची वेळ मान्यवरांवर येत आहे.
फोटो - - सराटी ( ता. इंदापूर ) येथील नीरा नदीत मौसमी पावसामुळे पाणी आल्याने पादुकांचे स्नान नदीच्या पाण्याने होणार आहे.
.....................................................................





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा