*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच जुन्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून क्लबच्या सन २०२४-२५ या वर्षासाठी अध्यक्षपदी शितल पांडुरंग दळवी,उपाध्यक्षपदी जयश्री पोटे,सचिवपदी मृणाल दोशी यांची निवड झाली आहे. खजिनदार म्हणून विजयालक्ष्मी गुळवे,आयएसओ म्हणून रश्मी शहा,एडिटर डॉ.शुभदा पोटे, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स मेघा जामदार,संयुक्ता दोशी,स्वाती चंकेश्वरा,शुक्ला दोशी यांची निवड झाली आहे.
यावर्षीची थीम हार्ट बीट ऑफ ह्युमिनिटी अशी आहे. कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी देऊन झाली आणि त्यानंतर इनरव्हीलच्या एस प्रार्थनेने झाली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्माकुमारी शिवरात्री दीदी ब्रह्माकुमारी प्रीती दीदी या उपस्थित होत्या.त्यांनी महिलांना हार्ट बीट ऑफ ह्युमिनिटी यावर मार्गदर्शन केले.जेलेसी आणि निगेटिव्हिटी यांना अवॉइड करा म्हणजे ईश्वर तुम्हाला अवार्ड देईल या वाक्यानी सुरुवात होऊन शेवट मेडिटेशनने झाला.पुढील वर्ष तणाव विरहित जाण्यासाठी हे मेडिटेशन सर्वांना खूपच उपयुक्त झाले.
माजी अध्यक्ष डॉ.श्रद्धा जंवजाळ यांनी सर्वाइकल कॅन्सरवरील प्रोजेक्ट विषयी माहिती देत सर्वोतोपरी मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे,त्यानंतर नूतन प्रेसिडेंट शीतल दळवी यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट विषयी माहिती दिली. त्यांच्या प्रोजेक्टची सुरुवात विठोबाच्या वारीमध्ये मेडिसीन वाटप करून,ट्री प्लॅनटेशन, महिलांमधील कॅन्सर समस्या, अपंग बालक व्हीलचेअर वाटप, बालसंस्कार वर्ग व बालचेतना योगा वर्ग,अंगणवाडी दत्तक योजना,महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या क्लासेसचे आयोजन,तसेच मानवता विकास होण्यासाठी ब्रह्माकुमारी यांचे लेक्चर व थीम प्रोजेक्ट व तसेच ऑनगोइंग प्रोजेक्ट चालू राहतील,तसेच इनर व्हील क्लबमुळे आपण किती गरजू लोकांपर्यंत पोहचू शकतो. काहीतरी त्यांच्या कामी पडतो हा आनंद खुप मोठा आहे असे बोलत त्यांनी भाषणाचा शेवट केला .
यावेळी पूजा फडे,गायत्री जामदार,सोनाली वाघोले,प्रतिभा यादव या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाले.नूतन प्रेसिडेंट शितल दळवी यांचा सत्कार त्यांचे माता पिता आणि मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा