*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
हल्ली सर्वत्र बलात्काराच्या घटना वाढत असून महिला युवती किंवा बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ला त्याच्या वयाचे नात्याचे सुद्धा भान राहत नाही ही दुर्दैवी बाब असून याला आळा बसणे काळाची गरज आहे
अशीच एक घटना उमरगा, जि.धाराशिव शहरामध्ये घडली असून एका 4 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर 56 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून काळीमा फासणारे कृत्य केले आहे
त्या अनुषंगाने या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस युवती शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी त्या पिढीतांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिला आणि आम्ही तुमच्या पाठीशी असून त्या नराधमाला कठोर शासन झाले पाहिजे या घटनेबाबत सक्षणाताई सलगर यांनी उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याची भेट घेतली आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा