इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा दिवसभराच्या प्रवासानंतर पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामी सराटी येथे सायंकाळी पोहोचताच ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून तोफांची सलामी देण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पादुकांची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर येथील मुक्काम आटोपून सकाळी पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्काम सराटीकडे मार्गस्थ झाली. इंदापूर अकलूज मार्गाने सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर वाटेतील गावामध्ये जागोजागी पालखी सोहळ्याचे स्वागत व दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी गर्दी केली होती. वडापुरी व बावडा येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा दुपारी साडेचार वाजता सराटीकडे मार्गस्थ झाला. बावडा ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी सोहळ्याला निरोप देण्यात आला.
सराटी येथे पालखीचे सायंकाळी साडेसात वाजता आगमन होताच वेशीवर ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फटाके व तोफांची सलामी देण्यात आली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून आणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आरती करण्यात आली. तसेच सराटी व परिसरातील भाविक व नागरिकांसाठी पादुका दर्शनासाठी मोठ्या रांगा लावण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्यासमवेत बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, विभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर महसूल, पोलीस, ग्रामविकास व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सेवा केली.
फोटो - सराटी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुकांची आरती जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आली.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा