इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- बावडा येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ५०० हून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. तसेच १०० हून अधिक रुग्णांची मधुमेह (शुगर) तपासणी करण्यात आली.
बावडा येथील कै. सुनंदा बाळासाहेब घोगरे व कै. सुदाम अनंतराव घोगरे यांच्या स्मरणार्थ यश हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरासाठी यश हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. तुकाराम घोगरे व डॉ.राजनंदिनी घोगरे, विशाल घोगरे, प्राजक्ता घोगरे, महेश पवार, पांडुरंग घोगरे, मुकेश मंडले, शुभम गुरव, दत्ता काळे, रुपेश भोसले, किरण शिंदे, गणेश शिंदे, आकाश बोडरे यांनी सहकार्य लाभले.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा