*सांगली -----पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो ;-8983 587 160
देवाला दानधर्म करण्यापेक्षा भुकेल्या , गरीब आणि गरजूंच्या पोटाला खायला द्या, कारण माणुसकी आणि "गरजूंच्या" समाधानातच खरा देव सामावलेला आहे.
अतिरिक्त अन्नाची नासाडी करण्यापेक्षा तेच अन्न फ्रिजमध्ये ठेवून गरजुंना देण्याचा उपक्रम चेन्नई च्या फातिमा जस्मिन या महिलेने राबवला आहे.
कचरागाडी अथवा कचराकोंडाळा मध्ये घरातील राहिलेले - शिल्लक अन्न टाकण्यापेक्षा लोक फातिमाच्या या सार्वजनिक फ्रिज मध्ये अन्न आणून ठेवतात. भूक लागलेली व्यक्ती तेथे येथे आणि जे हवे आहे ते घेते आणि तृप्त होऊन "अन्न" देणाऱ्याला "दुवा" देऊन निघून जाते. या फ्रिजजवळ एक कपाट देखील आहे. ज्यात न वापरणारे कपडे,चप्पल - बूट हें देखील ठेवलेले असतात. गरीब व गरजुंना जे कपडे - बूट हवे असतील ते येथे येऊन घेऊन जातात .
"एखाद्याचे" आशीर्वाद घ्यायचे असतील तर "शेकडो" मार्ग आहेत तथापि एखाद्याचा श्राप घ्यायचा असेल तर त्याला लुबाडून , मानसिक त्रास देऊन,अन्याय करून,त्याचे सर्वस्व "हडपून" परमेश्वराचा कोप घेता येतो. कपटी - धूर्त - कावेबाज असणारे अस्तनीतील निखारे "पदोपदी" पाहावयास मिळतात. म्हणतात ना की त्यांची "अर्श" से फर्श तक अशी अधोगती जगाला पाहावयास मिळते . असो ,
इस्लाम हा शांतता आणि परोपकारी धर्म आहे. "मानवता" आणि सदभाव याचा संगम झालेला सहृदयीधर्म आहे. ज्यांच्या एका ताटात हिंदू आणि मुस्लिम हें एकत्र "जेवण" करतात,आणि मैत्री -प्रेम - एकोपा यांच्यामाध्यमातून "राष्ट्रीय एकात्मतेचा" संदेश दिला जातो. किंबहुना आज चेन्नईच्या फातिमा जस्मिन यांनी गोरगरीब व गरजूंसाठी सार्वजनिक फ्रिज चा स्तुत आणि आदर्शवत उपक्रम सर्व शहरात राबवणे "हितावह" आहे .
जगातील कोणताही मनुष्य न जेवता झोपी जाऊ नये. तसेच आपला शेजारी अन्ना वाचून न जेवता उपाशी झोपला तर जो शेजारी खाऊन पिऊन झोपला आणि उपाशी असणाऱ्या शेजारची चौकशी केली नाही कि तु जेवण केला का? त्याने उपाशी झोपलेल्या शेजारला विचारले नाही तर तो इस्लाम च्या शिकवाणी नुसार गुन्हेगार आहे.यासाठी सामाजिक संस्थांनी अशाप्रकारे सार्वजनीक फ्रिज ची संकल्पना* साकारावी . मी स्वतः या अदभूत आणि विचारणीय संकल्पनेची आणि सामाजिक संस्थांच्या कार्याची प्रसिद्धी देईन !
"फातिमा जस्मिन" यांच्या गौरवशाली उपक्रमाचे अनुकरण भविष्यात मोठ्याप्रमाणात होईल ही आशा आहे .
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली .
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा