*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्रात रोज काही न काही कारणांनी आत्महत्या वाढत आहेत घटना आहे पुण्यातील प्रसिद्ध बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग म्हणजे कोंढवा याच भागात कोंढवा पोलीस ठण्यामधील पोलिसांच्या कामचुकार पणामुळे कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव शेख अब्दुल कलीम रशीद (वय ५० ) असं या व्यक्तीचे नाव आहे
कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी व लँड माफियांचा हैदोस यामुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे अशात पोलिसांकडे गेले तर त्या तक्रारदाराला न्याय मिळेल कि नाही याची शास्वतीच राहिली नाही कारण पोलीसच बघ्याची भूमिका घेऊन गप्प आहेत अशातच सामान्य माणूस ज्या वेळी तक्रार देण्यास जात असेल तर त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे साहेब नाहीत, उद्या या, परवा या, तुमचा अर्ज या साहेबांकडे आहे, त्या साहेबांकडे आहे, अशा प्रकारे टोलवाटोलवी करून अर्जदारास / तक्रारदारास खेळवले जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्यात सुरु आहे
शेख अब्दुल कलीम रशीद (वय ५०) यांनी कोंढवा परिसरातील कौसरबाग याठिकाणी व्यवसाय करण्यासाठी ८ गुंठे जागा खरेदी करून ती जागा भाडेतत्वावर दिली परंतु त्या जागेवर लँड माफियांनी खोटे दस्ताऐवज बनवून ती जागा हडप करण्याचा प्रयत्न केला गेला होता याबाबत शेख अब्दुल कलीम रशीद (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर सदर व्यक्तींवर १) आनंद मदनलाल मदानी, २) जहांगीर दोराबजी, ३) शेख अल्ताफ हुसेन अब्दुल मलिक, ४) शेख जिया अहमद अब्दुल मलिक यांनी संगनमताने बेकायदेशीर व बनावट कागदपत्र तयार करून जागा ताब्यात घेत असल्याचा तक्रारी अर्ज दिला त्यावर देखील कोंढवा पोलिसांनी स्वतः दखल न घेता वरिष्ठांच्या आदेशाने ( अभिप्रायाने ) ८ मार्च २०२३ रोजी ( गु. र.नं २५८/२०२३ ) दाखल करण्यात आला यामध्ये अटक न करता त्यांना सोडून देण्यात आले त्या नंतर त्यांनी पुन्हा त्या जागेवर गुंडशाहीने ताबा घेतल्याने शेख अब्दुल कलीम रशीद (वय ४७) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे हा अर्ज देऊन सुद्धा ७ ते ८ महिने झाले आहेत जागे संबधीत सर्व कागदपत्र देऊन देखील आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल होत नाहीये शेख कलीम यांनी गेली ७ ते ८ महिन्यांपासून कोंढवा पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारून मारून वैतागून गेले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांची अनेक वेळा भेट घेऊन देखील काहीच हरकत घेतली जात नाहीये हा तक्रारी अर्ज सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे यांचेकडे चौकशी साठी देण्यात आला होता या अर्जावर फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवत राहिले
शेवटी शेख अब्दुल कलीम रशीद (वय ५०) यांनी वैतागून पोलीस आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन करण्याचं पत्र दिले आणि त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांना बोलावण्यात आले आणि सांगण्यात आले कि, तुमच्या अर्जासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांची नेमणूक करण्यात आली यांनी देखील हे पेपर घेऊन या उद्या बोलावतो, परवा या, साहेबांना अहवाल देतो अशा उडवा उडवीचे उत्तर देऊन या सर्व प्रकाराला कंटाळून शेख अब्दुल कलीम रशीद (वय ४७) यांनी शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नमाज पठण करून त्यांच्या दुसऱ्या घरी ( मार्केटयार्ड या ठिकाणी ) दुपारी गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांची पत्नी यांनी पहिले असता तत्काळ आरडा ओरडा करून तो गळफास काढून टाकला आणि समजावून सांगतिले सध्या त्यांची प्रकृती बारी आहे परंतु अशातच जर या व्यक्तीला न्याय नाही मिळाला भविष्यात जे या व्यक्तींचा प्राण गेला तर जवाबदार कोण ? असा प्रश्न उदभवला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा