Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

*उद्योगपती मुकेश अंबानी यांनी घेतली "सोनिया गांधी "यांची भेट*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

नवी दिल्ली :* प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचे निमंत्रण सोनिया गांधींना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानी सुमारे तासभर ही भेट चालली.

अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण अनेक दिग्गज लोकांना दिला जात आहेत. काही पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी खुद्द मुकेश अंबानी जात आहेत. गेल्या महिन्यात २६ जून रोजी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलैला लग्न

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. या लग्नापूर्वी अनेक कार्यक्रमही पार पडत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा