Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० जुलै, २०२४

*यशवंतनगर येथे अज्ञात वाहनांने धडक दिल्याने युवकाचा मृत्यु*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

दि. 14/07/2024 रोजी सायंकाळी 07/00 वा. चे सुमारास मौजे यशवंतनगर येथील यशवंतनगर साखर कारखान्याचे मागील बाजुस असणा-या धवलनगर कडे जाणा-या रोडवर भिमा महादु काळे धवलनगर येथुन रस्त्याने जात असताना कोणीतरी अज्ञात वाहनाचे वाहन चालकाने भरधाव वेगात येवुन त्यांना जोराची धडक दिली. भीमा काळे रस्त्यावर पडलले पाहुन धडक देणारा निघुन गेला आहे. 

भीमा काळे यांना उपचाराकरीता उपजिल्हा रूग्णालय अकलुज येथे घेवुन गेले नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरीता सिव्हील हाँस्पीटल सोलापूर येथे घेवुन जाणेस सांगितल्याने त्यांना अकलुज क्रीटीकेअर अँन्ड ट्रामा सेंटर अकलुज येथे खाजगी रुग्णालयात आणुन अँडमीट केले असता ते उपचारा दरम्यान मयत झाले आहेत. 

याप्रकरणी मौसम भीमा काळे वय 39 राहणार बागेचे वाडी तालुका माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 377/2024 भारतीय न्याय संहिता 2023 BNS 106(1) भारतीय न्याय संहिता 2023 BNS 125(a) भारतीय न्याय संहिता 2023 BNS 125(b) भारतीय न्याय संहिता 2023 BNS 281 मोटरवाहन अधिनियम, १९८८ 134(B) १९८८ 134C मोटरवाहन मोटरवाहन अधिनियम, अधिनियम, १९८८ 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो स ई खारगे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा