Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ जुलै, २०२४

*तुळजापूर मंदिरात अपंग,वृध्द, वयस्कर,व लहान मुलाबाबत सुविधा उपलब्ध कराव्यात --तुळजापूर.ता.युवासेना प्रमुख प्रतिक रोचकरी यांची मागणी.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

तुळजापूर येथील मंदिरात भाविकांसाठी खालील सुविधा उपलब्ध कराव्यात म्हणुन तुळजापूर तालुका युवासेना प्रमुख "प्रतिक राजकुमार रोचकरी यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर चे अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे 

अपंग, वृध्द, वयस्कर लोकांबाबत व 

लहान मुलांबाबत सुविधा उपलब्ध करण्यासाठी केली आहे ती पुढीलप्रमाणे 

श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत दिव्यांग (अपंग), वयोवृध्द, वयस्कर व्यक्तींना श्री. तुळजाभवानी देविचे दर्शन घेण्यासाठी मंदिर सस्थान मार्फत डोली खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सदरील डोली / खुचर्ची ही वापरत असताना प्रत्येक व्यक्ती 500/- रुपये शुल्क हा मंदिर संस्थानास दयावा लागत आहे. त्यामुळे अपंग व वयोवृध्द व्यक्तींना देवीचे दर्शन घेण्यासाठी नाहक 500/- रुपये दिल्याने आर्थीक नुकसान होत आहे. तरी सदरील अपंग, वयोवृध, वयस्कर लोकांना मंदिरात दर्शनासाठी नेण्यासाठी असलेली डोली खुर्चीसाठी लावण्यात आलेले 500/- रुपये हे बंदकरुन सदरील सुविधा ही निशुल्क करण्यात यावी 

. तसेच श्री. तुळजाभवानी मंदिरात लहान मुलांचे जावळ काढण्याची प्रथा असुन अनेक भाविक भक्त श्री. देविजींच्या दरबारात आपल्या लहान मुलांचे जावळ काढतात. परंतु जावळ काढल्यानंतर लहान मुलांना अंघोळ घाल्याण्यासाठी त्यांना नाइलाजास्तव थंड पाणी घेवुन मुलांना त्यांना अंघोळ घालावी लागते त्यामुळे त्यांच्या लहान मुलै हे आजारी देखील पडतात. तरी श्री. तुळजाभवानी मंदिरात जावळ काढल्या नंतर तेथील लहान मुलांना अंघोळ घालण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी मागण्या केल्या असुन 

  जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांनी वरील मागण्याची लवकरात लवकर पुर्तता करावी अन्यथा शिवसेना युवा सेना यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे केली आहे.


श्री. प्रतिक राजकुमार रोचकरी तालुका प्रमुख युवासेना तुळजापुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा