Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ जुलै, २०२४

*मणिपूर मध्ये जे घडतंय ते देशात मी कोठेही पाहिले नाही--" राहुल गांधी" यांचे पंतप्रधानांना आवाहन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

मणिपूरमधील घडणाऱ्या हिंसाचारावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. लोकसभेचं अधिवेशन पार पडल्यानंतर सध्या राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचा मणिपूरचा हा पहिलाच दौरा असणार आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षांपासून सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.


मागील वर्षीच्या मे महिन्यापासून मणिपूर कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हा जातीय संघर्ष होत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी मणिपूरच्या चुराचंदपूर येथील हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली. यावेळी हिंसाचारग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये यावे, आणि पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील लोकांचे म्हणणे ऐकवे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.


*राहुल गांधी काय म्हणाले?*


“भारत सरकार आणि स्वत:ला देशभक्त मानणाऱ्या प्रत्येकाने मणिपूरच्या लोकांशी संपर्क साधला पाहिजे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे. मला असं वाटतं की, पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरच्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे. मणिपूरमध्ये काय चाललं आहे? हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मणिपूर हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे. पंतप्रधान मोदी हे जर येथे आले असते तर राज्यातील जनतेला दिलासा मिळेल”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधी पुढे म्हणाले, मणिपूरमध्ये जे घडतंय ते देशामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी मी पाहिलं नाही. त्यामुळे मोदींनी मणिपूरमध्ये येऊन येथील लोकांना धीर द्यायला हवा. मणिपूरमधील परिस्थिती व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा आहे. पण सध्या दुर्दैवाने येथील परिस्थिती चांगली नाही. राज्यात द्वेष आणि हिंसाचार पसरला आहे. या सर्व गोष्टीचे मला मला राजकारण करायचं नाही. पण मणिपूरमधील परिस्थिती पाहून वाईट वाटते. या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करण्यास आम्ही तयार आहोत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा