*श्रीपूर --बी.टी शिवशरण
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशपातळीवरील सहकारी साखर कारखाना अव्वल स्थानावर सर्वोत्कृष्ट ठरला आहे या बाबतची माहिती कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांनी दिली चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे उत्तम मार्गदर्शन चोख नियोजन व बदलत्या प्रायोगिक कार्यप्रणालीवर कारखाना सतत वेगवेगळे उपक्रम राबवून कारखान्याचे वाटचालीत शेतकरी सभासद हित जोपासत आहे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वाटचालीत या पुर्वी कारखान्याने राज्यपातळीवर असलेले अनेक नामवंत संस्था तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे साखर कारखानदारी मधील सर्व प्रतिष्ठेचे पुरस्कार सन्मान मिळवले आहेत महाराष्ट्र राज्य शासन यांचा वनश्री पुरस्कार सहकार भूषण पुरस्कार बेस्ट एमडी पुरस्कार बेस्ट अकौंटट पुरस्कार तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम मानांकित पुरस्कार शेतकी अधिकारी पुरस्कार उत्कृष्ट चिफ केमिस्ट इंजिनिअर असे अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांच्या अचूक निर्णयक्षमता दुरगामी दृष्टिकोन आर्थिक व्यवस्थापन शिस्त काटकसर तसेच कामातील पारदर्शकता आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे सदर कारखान्याला यशाचे शिखरावर पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत या कारखान्यात नेहमी शेतकरी सभासद हित कामगारांना सर्व सुविधा आदराची वागणूक दिली जाते एक लौकिक आदर्श परंपरा व श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवरुन कारखान्याचे चेअरमन सह सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक यांचे खंबीर सारथ्य यामुळे हा कारखाना महाराष्ट्रात आदर्श कारखाना म्हणून लौकिकास पोहोचला आहे आज कारखान्यास दिल्ली वरुन उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याचा मेसेज आला कारखाना कार्यस्थळावर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला या वेळी श्रीपूर मराठी पत्रकार संघाचे वतीने कारखान्यास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा