Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जुलै, २०२४

*महाविकास आघाडी च्या जागा वाटपा बाबत" शरद पवार "यांनी सांगितला डिटेल फॉर्मुला*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

आमच्या लोकसभेतील विजयामध्ये छोट्या पक्षांनी जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला. धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आता आमचं तीन पक्षांचं कर्तव्य आहे की, त्यांनाही जागा देणे. असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेत महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार? याचा डिटेल फार्म्युला सांगितला.

*यावेळी पवार म्हणाले की,.*

▪आमचं आताचं धोरण विधानसभेचं तीन मुख्य पक्ष आहेत. तिघांची शक्ती जवळपास समान कमी जास्त प्रमाणात आहे. या सगळ्यांमध्ये समान आकडा ठरवून आम्ही वाटप करू शकतो. माझं म्हणणं त्याच्यात असं आहे की, आम्ही जसं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष यात आहे. माझ्या नेतृत्वाखालचा पक्ष यात आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस यामध्ये आहे. या सगळ्यांशिवाय इतरही काही लहान घटक आहेत ज्यांनी कालच्या निवडणुकीत निवडणूक लढली नाही. जागा मागितल्या नाहीत पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं.

▪उदा. शेतकरी कामगार पक्ष रायगड असेल सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणं असतील त्यांची काही मतं आहेत. किंवा सीपीएम असेल आज आपण डहाणू वगैरे भागात गेलो आजही त्यांचे आमदार आहेत.आपण नाशिक जिल्ह्यात गेलो तर आजही तेथे त्यांची लोकं आहेत. किंवा अन्य ठिकाणी डावे कम्युनिस्ट उजवे कम्युनिस्ट. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष की ज्यांच्याकडं आताही दोन तीन आमदार आहेत. या सगळ्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला.

▪आता आमचं कर्तव्य असं आहे तीन पक्षांचं. की लहान पक्ष असेल धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेतात आमच्या दृष्टीने अनुकूल भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे सगळ्या जागा आम्ही घेणं योग्य नाही आम्हाला त्यांना सुद्धा जागेच्या संदर्भात सहभागी करून घ्यावं लागेलं. एकत्र निवडणूक राज्य कसं आणता येईल यावर आमच्या सगळ्यांचं लक्ष राहिल.

▪प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले,. आम्ही नेहमीच त्यांच्याबद्दल समजुतीची समंजसपणाची भूमिका घेतली पण त्यांची जी अपेक्षा होती ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आणि ती पूर्ण करू न शकल्यानेच आम्ही वेगळे लढलो. आता उद्याच्या निवडणुकीत सुद्धा त्यांची भूमिका एकला चलो रे ची दिसते. त्यामुळे ही जर भूमिकाच त्यांनी घेतली असेल तर त्यांच्यात आमच्यात एकवाक्यता होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा