*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर लोकसभाचे नूतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर सह सहा जिल्ह्यांकरिता सर्किट बेंच होणे बाबतची मागणी खूप दिवसांपासूनची प्रलंबीत असून कोल्हापूरचे खासदार या नात्याने श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी पुढाकार घेऊन व सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावावा याबाबत त्यांना विनंती करण्यात आली सर्किट बेंच कोल्हापूर या ठिकाणी होण्याकरिता सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची बैठक होणे गरजेचे आहे व तसेच स्पष्टपणे आदेश करून मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी सन २०२२ मध्येच खंडपीठ कृती समितीस कळविलेले आहे मात्र खंडपीठ कृती समितीने मुख्यमंत्री यांना याबाबत पाठपुरावा करून,विनंती करून देखील त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची भेट घेतलेली नाही त्यामुळे सर्किट बेंच करिता मुख्यमंत्री आणि मा.उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट होणेकरीता आपले स्तरावर प्रयत्न करावेत अशी विनंती नूतन खासदार यांना केली आहे.
श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मा.उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांचेसोबत भेट लवकरात लवकर घेणेस प्रयत्न करतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व खंडपीठ कृती समिती यांची लवकरच बैठक आयोजन व्हावे याकरिता विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिले .
श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांची भेट घेणेकरिता बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महादेवराव आडगुळे,ॲड. शिवाजीराव राणे,ॲड.रणजित गावडे,ॲड.अजित मोहिते,ॲड. आर.एल.चव्हाण,ॲड.व्हि.आर. पाटील,ॲड.राजेंद्र मंडलिक,ॲड. नारायण भांदिगरे,बारन असोसिएशनचे सचिव ॲड. निशिकांत पाटोळे,ॲड.राजून ओतारी,ॲड.विजयकुमार ताटे - देशमुख,ॲड.संदीप चौगुले,ॲड. अरुण पाटील,ॲड.गुरुदत्त पाटील,ॲड.अमृत राणोजी,ॲड. अनिकेत डोंबे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा