Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जुलै, २०२४

*राष्ट्रवादी चे अनिल देशमुख यांचा फडणवीस यांच्या वर खळबळजनक आरोप--- राजकीय चर्चेला उधान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

मुंबई :--माझ्यावर झालेली ईडी व सीबीआयची कारवाई टाळायची असेल, तर उद्धव ठाकरे व शरद पवारांवर ते सांगतील तसे आरोप करा, असा निरोप देवेंद्र फडणवीसांच्या माणसाने आपल्याला दिल्याचा खळबळजनक दावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. देशमुख यांच्या या आरोपाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळले असून, एकच खळबळ उडाली आहे.

देशमुख म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. ठाकरे व शरद पवारांना सोडून जे काही लोक गेले ते ईडी आणि सीबीआयच्या धाकाने गेले आहेत. माझ्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपल्यावरील ईडी आणि सीबीआयची कारवाई टाळायची असेल तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर, ते सांगतील तशा पद्धतीचे आरोप करण्याचे मला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आल्याचा गंभीर आरोपही, देशमुखांनी केला आहे.

नेमके काय होते प्रकरण

देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत बॉम्ब ठेवण्यात आले होते. या बॉम्ब ठेवण्याच्या प्रक्रियेत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि त्यांचे सहकारी सहभागी असल्याची माहिती आपल्याला मिळाली. गृहमंत्री म्हणून चौकशी करत असताना आपण त्यांना बदली करून बाजूला केले. त्यांच्या बदलीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला हाताशी धरून माझ्यावर शंभर कोटींचा आरोप करण्यात केला. मात्र शेवटी त्यात तथ्य दिसून न आल्याने आपण सुटलो.

नेमका काय केला आरोप...

देशमुख म्हणाले, 100 कोटींच्या खोट्या आरोपाच्या गुन्ह्यात मी 14 महिने जेलमध्ये काढले. माझ्यावर आरोप लावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या माणसांना आपल्याकडे पाठवले. तुम्ही दोषी नाहीत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे त्या माणसाने मला सांगितले.

काही कागदपत्र असलेले पाकीट मला पाठवले. त्या कागदांवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर मी काय आरोप लावायचे होते. हे आरोप केले तर तुम्हाला ईडी किंवा सीबीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे त्या माणसाने सांगितले. मी जेलमध्ये जाईल, मात्र अशा प्रकारचे कृत्य आपण कधीही करणार नाही, असे मी त्यांना सांगितले असेही अनिल देशमुख यांनी जाहीर सभेत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा