Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जुलै, २०२४

*गिरझणी ता. माळशिरस येथे "कृषी जागरूकता कार्यानुभव" कार्यक्रम संपन्न*

 


*विशेष ---प्रतिनिधी*

*राजु मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.8408 817 333

श्रीराम कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय पाणीव यांच्यावतीने गिरझणी या गावामध्ये कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण कृषी चर्चासत्र कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून करण्यात आले यावेळी श्रीराम कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य सुगंध शिंदे सर विजय तरंगे सर गिरझणीचे सरपंच सौ गंगुबाई साठे, उपसरपंच सचिन गायकवाड, माजी सरपंच विजय माने ,माजी चेअरमन हरी माने, पोलीस पाटील महेश गिरमे, माजी सरपंच शोभा माने, कृषी अधिकारी अण्णा नलवडे, दत्तात्रय खुपसे, मयूर माने, रमेश साठे, लक्ष्मण माने, काकासो पवार, सोपान माने, नवनाथ माने, पांडुरंग माने, पोपट पवार, लक्ष्मण कुंभार , शंकर वाघ, विजय पवार अक्षय माने , रोहित खुसपे महादेव साठे,यांच्या हस्ते करण्यात आले 



 श्रीराम कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्या म्हणून विद्या गेंड, वेणू खंदारे, योगिता बिनवडे, प्रियंका जाधव भक्ती कवितके ,सानिका चवरे, सोनाली खपाले या उपस्थित होत्या यावेळी कृषी चर्चासत्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेळके सर, साठे सर, नलवडे सर, यांनी केले व शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यावर उपाययोजना यावर सविस्तर माहिती सांगितली व शासनाच्या नवीन योजना त्यावरील माहिती सांगण्यात आली नवीन योजनेचे अंमलबजावणी कशी करायची कसा लाभ घ्यायचा यावर मार्गदर्शन केले शेतकऱ्यांच्या अडचणी यावर दत्तात्रय खुसपे सर यांनी शेती विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा