*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अखिल भारतीय विज्ञान संस्था नागपूर यांच्या वतीने काक्रंबा तालुका तुळजापूर येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बाल विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली होती
या प्रसंगी काक्रंबा केंद्राचे केंद्रप्रमुख लोखंडे एस.एस, केंद्रीय मुख्याध्यापिका उंबरे मॅडम, बाळेश्वर विद्यालय बारुळचे मुख्याध्यापक अणदुरकर सर, सुर्वे यु बी मैंदर्गी सर, गाडे सर, ठोकरे मॅडम, चव्हाण सर, बरबडे सर, राठोड सर उपस्थित होते.
याप्रसंगी लोखंडे सर यांनी प्रास्ताविक केले तर मैंदर्गी सर यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून मुलाणी ए.जे व टकले सर यांनी काम पाहिले. या परिषदेसाठी केंद्रातील नऊ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक म्हणून बाळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा शिवमूर्ती बोने तर द्वितीय क्रमांक म्हणून जिल्हा परिषद खंडाळा शाळेची स्नेहल संतोष काकडे हीने यश मिळवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलानी ए.जे. यांनी केले तर सुर्वे यु. बी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा