*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
दिनांक 16/07/2024 मंगळवार रोजी प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्था व श्री. सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेंबळी च्या वतीने विविध परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
1) बेंबळी येथील माजी मुख्याध्यापक श्री सुनील भिमाशंकरप्पा गिरवलकर यांचे चिरंजीव गणेश गिरवलकर हा CA ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाला गणेश गिरवलकर याने बेंबळी व बेंबळी परिसरातील एकमेव CA असण्याची छाप सोडली आहे. व आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे.
2) बेंबळी येथील ॲड. विजयकुमार भोसले यांची कन्या अस्मिता भोसले ही IIT साठी पात्र ठरलेली आहे.* अस्मिता देखील आपल्या आपल्या बेंबळी परिसरातील एकमेव अशी कन्या आहे जी IIT साठी पात्र ठरली आहे.
3) श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय बेंबळी येथील सहशिक्षक श्री रजाक शेख यांचे चिरंजीव डॉ.नदीम शेख हा एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल अण्णा गिरवलकर होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष . आबासाहेब बोंदर , तसेच जिजामाता कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक आगळे सर, केंद्रप्रमुख कनगरा संजय तानवडे सर, कनगरा केंद्रीय शाळा मुख्याध्यापक तिगाडे सर, नांदुर्गा जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक पाटील सर,प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग चाचा व्हनसनाळे, मुख्याध्यापक आरळे सर,माजी मुख्याध्यापक श् गिरवलकर सर, ज्येष्ठ शिक्षक माने सर, माजी मुख्याध्यापक मस्के सर, शेख सर, स्वामी मॅडम खापरे मॅडम, श्री तानवडे सर, गिरवलकर सागर सर, खालीक सर, " फसके सर, दाणे सर, सुरेश मोटे, श्री शिवाजी स्वामी, आशितोष होळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले.
या सत्कार समारंभास सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, जिजामाता कन्या प्रशाला चे विद्यार्थिनी व प्रभाकर बोंदर या शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. आपले सत्कार मूर्ती यांनी या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.
.नदीम शेख याने त्याच्या आतापर्यंतच्या शिक्षणाबद्दल कशा पद्धतीने वाटचाल केली याबद्दल माहिती सांगितली.
कुमारी. अस्मिता हिने तिचे आठवीपासून चे शिक्षण कोटा येथून घेतले व अथक परिश्रम करून आपले यश संपादन केले.
. गणेश गिरवलकर याने आपल्या भाषणात CA होण्यासाठी कशा पद्धतीने सुरुवात केली व त्याचा अभ्यास पूर्णपणे क्लासेस वर अवलंबून न राहता स्वतः सेल्फ स्टडी करून तसेच ज्या ज्या वेळी अडचण येईल त्यावेळेस युट्युब व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शंका दूर केली. त्याने विद्यार्थ्यांना देखील हेच सांगितले की अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लासेस लावावेत असा आपला गैरसमज असतो, ते गैरसमज दूर करून आपण सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून आपल्या सर्व शंका ऑनलाईन देखील दूर करू शकतो व आपण आपल्या ध्येयाला यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. CA पात्र होण्यासाठी फक्त आणि फक्त उच्च मार्क अवलंबून असतात, यामध्ये जातीनिहाय यादी लागत नाही. त्यामुळे येथे कोणावरही अन्याय होत नाही जे चांगले ज्ञान आत्मसात करतील तेच यामध्ये यशस्वी होतील.
विद्यार्थ्यांनी कुठलेही शिक्षण निवडले तरी ते सर्वस्वी स्वतःवर असते की आपण त्यासाठी किती परिश्रम व कष्ट घेत आहोत व आपले ज्ञान आत्मसात करत आहोत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल अण्णा यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना असे सांगितले की कुठलेही यश प्राप्त करण्यासाठी आपणाला सुरुवातीला गाढवा सारखी मेहनत करावी लागते व नंतरच आपण राजासारखे जगू शकतो. त्यामुळे सर्वांनी अथक परिश्रम करून आपले ध्येय साध्य करावे.
या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला व त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल व अभ्यासाबद्दल नवी उमेद जागृत केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोबारे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा