*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सुरत बायपास रोडवर दुचाकीस्वारास लुटमार करणारे गुन्हेगार धुळे शहर गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद करण्यात आले असुन याबाबत पोलिस सुञा कडून मिळालेली माहिती अशी कि
फिर्यादी दादाभाऊ बारकु पारधी वय ३३ रा.वार (कुंडाणे) ता. जि. धुळे हे दि.२५/०६/२०२४ रोजी रात्री ११/०० वा. सुरत बायपासवरील रोडवरुन सिव्हील हॉस्पीटल कडेस जात असतांना पाठीमागुन आलेल्या मोटारसायकल वरील ३ अनोळखी इसमांनी फिर्यादीला हाताबुक्यांनी मारहाण करुन दुखापती करुन त्यांचे ताब्यातील मोबाईल, पाकीट व त्यातील साहीत्य व रोख रक्कम जबरीने चोरुन नेल्याने धुळे शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.३०३/२०२४ भा.द.वि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा गंभिर स्वरुपाचा असल्याने गुन्हेगारांची माहीती प्राप्त करीत असतांना रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशिटर असलेला आरोपी नामे १) बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड वय २२ वर्षे रा. राउळवाडी, चितोड रोड, धुळे व २) भुषण शिवदास पाचारे वय २८ वर्षे रा. नवजीवन नगर, फाशीपुल धुळे अशांनी त्यांचे इतर साथीदारांसह केल्याची खात्रीशिर बातमी पोलीस निरीक्षक श्री. धिरज महाजन यांना प्राप्त झाली. सदरचे दोन्ही आरोपी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभिर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृह, धुळे येथे असल्याने त्यांचा ताबा घेण्यात आला. आरोपींना कसोशीने विचारपुस केली असता भुषण पाचारे याने त्याचे इतर २ साथीदार रोहन अवचित्ते व सागर प्रजापती अशांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचा शोध घेतला असता त्यांनी त्यांची नावे ३) रोहन अनिल अवचित्ते वय २२ वर्षे रा. खंडेराव महाराज मंदिराजवळ, चितोड रोड, धुळे ४) सागर जगदिश प्रजापती वय २२ वर्षे रा. नवजिवन ब्लड बँकेच्यामागे, सुशिलनगर, धुळे असे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम
हिस्ट्रीशिटर आरोपी नामे बब्या उर्फ कृष्णा गायकवाड यास सोपवुन मौजमस्ती केल्याचे सांगितले. फिर्यादीस मारहाण करुन जबरी चोरी केलेल्या खालील वस्तु भुषण पाचारे याचे राहते घरातुन व गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
१) ५०००/-रु किमतीचा फिर्यादीचा मोटोरोला ई -१३ कंपनीचा मोबाईल
00 /-रु. कि.चे पाकीट त्यामध्ये फिर्यादीचे १) पॅनकार्ड कार्ड व ATM कार्ड
५०,०००/- रु.कि.ची आरोपीची होन्डा लिवो कंपनिची मोटासायकल क्र. MH१८AU८३३५ (गुन्हा करतेवेळी वापरलेली) असे
एकुण ५५,०००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करुन
सदर गुन्ह्यात चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना ०५ दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई / बाळासाहेब सुर्यवंशी करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. श्रिकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे, सहायक पोलीस अधिक्षक श्री. ऋषीकेष रेड्डी, पोनि/श्री. धिरज महाजन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकों/दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, पोना/रविंद्र गिरासे, कुंदन पटाईत, पोकों/शाकीर शेख, महेश मोरे, प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार पारधी, अमित रनमळे, वसंत कोकणी, अमोल पगारे, योगेश ठाकुर, चापोकों/दिपक सैंदाणे यांनी कामगिरी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा