*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
दहिगाव उपसा सिंचन मध्ये असलेल्या गावांना अद्याप पाणी पोहोचलेले नाही, असे असताना यामध्ये आणखीन गावे समाविष्ट करू असे आश्वासन दिले जात आहे. कुणी उगाचच मंत्र्यांना संत्र्यांना भेटून वेगवेगळ्या योजनांचा बोलबाला करत आहे. कुणाचे उगाचच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात दौरे सुरू आहेत. एकीकडे जनता अद्यापही दुष्काळाने होरपळलेली आहे, आजही अनेक गावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे मात्र आश्वासनांच्या पावसात कार्यकर्ते उगाचच चिंब नाहून निघत आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचा हा कुटील प्रयत्न असल्याचा घणाघात अतुल खूपसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उजनी धरणात सर्वाधिक गावे करमाळा तालुक्यातील गेली आहेत. पाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर नांगर फिरवला. असे असताना देखील धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे आजी-माजी आमदारांनी फक्त शब्दांची अदलाबदल करत नेहमीच शेतकऱ्यांना वेड्यात काढले आहेत. मुळात दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये २९ आहेत. यासाठी १.८१ टीएमसी पाणी मंजूर आहे. मुळातच या दहिगाव उपसा सिंचन मध्ये समाविष्ट असलेल्या शेवटच्या गावात अद्याप पाणी पोहोचलेले नाही. मात्र या उपसा सिंचन मधून राहिलेले ०.४६ पाणी बचत होणार म्हणे आणि मधून आणखीन गावांना पाणी मिळणार असा जावईशोध लावला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लोकांना व शेतकऱ्यांना सरळ येड्यात काढण्याचा धंदा या सर्वपक्षीय नेत्यांनी लावला असल्याचा त्यांनी आरोप केला.
यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे राणा वाघमारे, गणेश वायभासे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, सोमा कातुरे, जयसिंग पाटील, बिभिषण शिरसट, महेश नरसाळे, रवींद्र नरसाळे, शहाजी नरसाळे, राहुल जाधव, शंकर नरसाळे, अक्षय देवडकर, सुशांत खूपसे, अभिमान गायकवाड उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा