*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आज दिनांक २४/०७/२०२४ रोजी पाऊसाने दिवसभर रिमझिम चालूच ठेवली अश्या परिस्थितीत बोरगाव ता माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता हा दलदलीचा झाला असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांना त्याच्या आजारा पेक्षा घसरगुंडी आजाराशी ज्यास्त सामना करावा लागत आहे काही पेशंट रस्ता बघुन उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात नाहित प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर कर्मचारी सेविका व गरोदर माता भगिनींना जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारी गोरगरीब जणता आहे त्यांच्यासाठी साधा सुखाचा रस्ता नाही माजी मिशीदार खासदार निंबाळकर व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी काही ठिकाणी निवडणूक पुर्वी रस्त्यांची उद्घाटने केली परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पाणीदार खासदार आणि पाणीदार आमदार त्याच्या डोळ्यात पाणी तरळले असल्या कारणाने दिसला नसावा हा प्रश्न निर्माण झाला आहे मोठ मोठ्या गप्पा मारणारी नेते मंडळी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करून आहेत हेच मोठं दुर्दैव आहे पाणिदार माजी खासदार आणी पाणीदार विद्यमान आमदार यांना जनतेने पाणीदार पदवी दिल्याने जिकडे तिकडे रस्त्यावर सुद्धा पाणीच पाणी साचत आहे बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्त्यावर सतत दळणवळण असुन उपचारासाठी रहदारी असते अश्या काळात जर त्या रस्त्यावरून घसरुन पडावे लागते नीट चालता येत तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो की आपण उपचारासाठी चाललोय की स्मशानात त्यामुळे आजारा बरोबर ह्या वाढीव त्रासामुळे दोन गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी तातडीने दख्खल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करावा किंवा स्थानिक खासदार आमदार यांच्याकडे मागणी करुन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे व गोरगरीब जनतेला होणाऱ्या त्रासातुन मुक्त करावे तेवढेच पुण्य प्राप्त होईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा