*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
02 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता.तुळजापूर येथील सेवाज्येष्ठ शिक्षक सारणे डी.एल. यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. अभ्यासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काक्रंबा बिटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे यांनी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना मार्गदर्शन केले.केंद्राचे केंद्रप्रमुख लोखंडे सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मान्यवरा समोर सांगितला. व शाळेची प्रगती लोकसभागातून कशी केली ह्याबाबत माहिती दिली.याप्रसंगी बाबुराव ठोंबरे, सरपंच शहाजी सुपणार, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, कमलाकर ठोंबरे, ग्रा. पं.सदस्य सुनील नवगिरे, रणजीत सगर, डी.के.सगर सर, बारूळ शाळेचे मुख्याध्यापक पवार बी. टी,मोरे एन. एस, जाधव एस.के,चव्हाण के.एच, गडेकर आर.एच, वाघमारे एस. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलाणी ए.जे यांनी तर वाघमारे एस.व्ही.यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा