*विशेष ---प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.8408 817 333
पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे औद्योगिक वसाहत (MIDC) मंजूर करणेबाबत विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे
सन २०११ चे जनगणनेनुसार पंढरपुर तालुक्याची लोकसंख्या सुमारे ४,४२,३६८ इतकी असून सद्यस्थितीत पंढरपुर शहर व ग्रामीण भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच पंढरपुर तालुक्यालगतच मोहोळ व माढा तालुका असुन या सर्व भागातील सुशिक्षीत व कार्यकुशल बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येथील नव उद्योजकांना संधी उपलब्द करुन देण्याच्या दृष्टीने ग्रामीण विकासाच्या राज्य शासनाच्या धोरणास अनुकुल सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करणे आणि प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औद्योगिक वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने येथे औद्योगिक वसाहत (MIDC) होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या दृष्टीने पंढरपुर तालुक्यातील मेंढापुर येथे [गट नं १२९ (१७८३)-१५ हे.५२ आर], [गट नं १३३(१७६९)-१७ हे.९२आर], [गट नं १४७ (१७७२) १६ हे.८३ आर], [गट नं १४९ (१७८१)-१६ हे.८३ आर], [गट नं१५० (१७८२)-२१हे.९७ आर], [गट नं १५१-१७ हे. ६२ आर], [ गट नं १५९-२२ हे. १४ आर] असे १२८ हेक्टर ८३ आर (३२२ एकर) शासकीय मालकीची जमीन उपलब्द आहे. सदर जमीनीची मालकी महाराष्ट्र शासनाकडेच असलेने इतर शेतक-यांची जमीन संपादित करावी लागणार नाही. तसेच या भागाच्या औद्योगिक विकासासाठी पोषक पायाभूत सुविधा म्हणुन पालखी मार्गासहीत पंढरपुरला जोडणार्या महामार्गाचे जाळे, त्यामुळे निर्माण झालेली दळणवळणाची सुलभता, तसेच भिमा डावा कालवा व चंद्रभागा नदीतुन सहज उपलब्द होणारे पाणी व विजेची सुलभ वितरण प्रणाली या पायाभूत सुविधाची कुठलीही कमतरता भासणार नाही.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा