*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूजच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे वतीने ऊस पिक परिसंवादाचे आयोजन विभागीय कार्यालय महाळुंग- बोरगांव येथे करणेत आले होते. या कार्यक्रमाची सुरवातीस सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.पुणे चे शास्त्रज्ञ राजाराम यादव व डॉ.समाधान सुरवसे यांचे शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी भूषविले
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेत कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
ऊस पीक परिसंवादामध्ये ऊस पिकाच्या वाढीसाठी मातीचे आरोग्य आणि संवर्धन याविषयी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु.चे शास्त्रज्ञ डॉ.समाधान सुरवसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच ऊस पिकावर येणा-या किड व रोगापासून ऊस पिकाचे संरक्षण व उपाययोजना या विषयी राजाराम यादव यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील म्हणाल्या की,आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी सभासदांचे ऊस पिकाकरीता आर्थिक समीकरण महत्वाचे असून ऊस उत्पादनात व साखर उता-यामध्ये वाढ होणे महत्वाचे आहे. यासाठी आजच्या परिसंवादामध्ये तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. आपल्या कारखान्याने ऊस पिकाला अवर्षण परिस्थितीमध्ये सामना करणेसाठी शिवऊर्जा व जैव संजिवके तसेच जमिनीचा पोत सुधारणेसाठी ह्युमिक ॲसिडची निर्मीती केली असून ते ना नफा ना तोटा या तत्वावर रास्त दरात सभासदांना उपलब्ध करून दिले जात आहे. याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा.
या ऊस पिक परिसंवादामुळे एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणेकरीता तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन झाल्याने परिसरातील ऊस उत्पादन शेतकरी,सभासद व बिगर सभासद यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
या ऊस पिक परिसंवादासाठी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे,विजयकुमार पवार, विराज निंबाळकर,महादेव क्षिरसागर,भिमराव काळे,सुभाष कटके,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील,रामचंद्रराव सावंत- पाटील,संचालिका सुजाता शिंदे,कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने- देशमुख,दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे,राजेंद्र भोसले, अमृतराज माने- देशमुख,नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे,श्रीकांत बोडके तसेच महाळुंग बोरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी,सभासद,बिगर सभासद मोठ्या संख्येने उपस्थीत होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा