Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

*केस कापले ..रक्त काढले.. जेवण केले नाही.. झोपली नाही ...तरीही फक्त 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाट"चे स्वप्न भंगले*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

कोणत्याची खेळाडूच्या वाट्याला असा दिवस येऊ नये, तो भारताच्या विनेश फोगाटच्या वाट्याला आला. मागील वर्षभर जंतरमंतरवरील आंदोलानमुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागणाऱ्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांना सडेतोड उत्तर दिले. ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिने प्रवेश करून इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची फायनलमध्ये प्रवेश मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

१७ ऑगस्ट २०२३ मध्ये विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती आणि ८ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्टला तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच पुन्हा पायावर उभं राहण्याचे वचन दिले होते आणि आज ६ ऑगस्टला २०२४ मध्ये ती ऑलिम्पिक फायनल खेळणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. पण, बुधवारचा दिवस तिच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आला.. १०० ग्राम वजन अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवले गेले.



२ किलो वजन करण्यासाठी काय नाय केलं...

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला डिहायड्रेशनमुळे चक्कर आल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते आणि ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती. त्यामुळे तिला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जेव्हा तिला अपात्र ठरवले गेले, तेव्हा तिला चक्कर आली आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तीन बाउट्समध्ये भाग घेतल्यानंतर आणि दिवसभर स्वतःला रिकव्हर केल्यानंतर, विनेशचे वजन वाढल्याची शक्यता आहे. अंतिम वजनासाठी आवश्यक वजन पूर्ण करण्यासाठी तिला रात्रभर अंदाजे २ किलो वजन कमी करावे लागले. विनेशला तिच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर घामाच्या सूटमध्ये काहींनी पाहिले आणि तिने रात्रभर जास्तीचे वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तिच्या प्रयत्नांनंतरही, विनेशचे वजन १०० ग्रॅम वजनाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

तिचे केसही कापले...

विनेश, तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी कालची रात्र आव्हानात्मक होती. विनेशने वजन कमी करण्यासाठी काही खाल्ले नाही किंवा पाणीही प्यायली नाही. सर्व उपाय करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विनेशचे केसही कापले गेले आणि रक्तही काढले गेले. पण तरीही अपयश आले, असे वृत्त स्पोर्टस्टारने दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा