Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

*उस्मानाबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी अँड हायस्कूल ला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


 

*मुख्यसंपादक--हुसेन मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो ;-9730 867 448*

उस्मानाबाद येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू प्रायमरी अॅण्ड हायस्कुल, शाळेचे 10 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकसहीत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला

मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू प्रायमरी अॅण्ड हायस्कुल, ख्वाजा नगर, उस्मानाबाद यांचे शिक्षण सेवा 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्याचा पालकासहीत सत्कार आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद जिल्हयाचे अॅडीशनल एस.पी. श्री. गोहर साहेब हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद जिल्हयाचे वरिष्ठ नेते श्री. डॉ. प्रतापसिंह पाटील, शेख मसुद साहेब, प्राचार्य डॉ. गाजी सर, प्राचार्य डॉ. आमेर काझी सर, डॉ. अर्शद सय्यद, व नगर सेवक- बाबा मुजावर, नगरसेवक इस्माईल शेख हे उपस्थित होते.



अॅडीशनल एस.पी. साहेबांनी विद्यार्थ्यांना परिपुर्ण मागर्दर्शन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. गाजी सर यांनी शाळेने केलेल्या 10 वर्षे शिक्षणाचा आढावा लोकांसमोर मांडला तसेच मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू हायस्कुल या शाळेने शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षण सेवा केली त्याबद्दल कौतुक केले तसेच लोकांना असे अवाहन केले की, या संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव करावा तसेच त्यांनी केलेल्या संकल्पनेला सहकार्य करण्याची विनंती केली.


तसेच प्राचार्य डॉ. आमेर काझी यांनी 10 वर्षात शिक्षण संस्थेने घडविलेले विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेचे शिक्षक व मॅनेजमेंटबद्दल अभिनंदन व्यक्त केले. या वेळी डॉ. सय्यद अर्शद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी असे अव्हान केले की, मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू हायस्कुल ही शाळा मुस्लीम समाजात शिक्षणाची क्रांती आणत आहे व मुस्लीम समाजातील वरिष्ठ नेते शेख मसुद यांनी शाळेचे 10 वर्षे शिक्षण सेवा केलेल्या कार्याची परिपुर्ण माहिती लोकांना दिली पुढे असे सांगितले की, मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू हाय स्कूल ही शाळा उस्मानाबाद शहराची गरज आहे तरी उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी या शाळेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे



     शाळेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलीमोद्दीन Iqbal प्रास्ताविकात शाळेचा  10 वर्षाचा अहवाल सादर केला आणि या शाळेचे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर फार्मासिस्ट शिक्षक व इतरक्षेत्रामध्ये शिक्षण घेत असल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला   हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा