Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना कार्यकारणीची सोनाई पॅलेस येथे सोनाई परिवाराच्यावतीने सन्मान

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना २०२४-२५ ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. सोनाई पॅलेस येथे कार्यकारिणीची निवडी बद्दल सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने व पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रविण भैय्या माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   अध्यक्षपदी निवड झालेले ॲड. गिरीश शहा, उपाध्यक्ष ॲड. भारत कडाळे व ॲड. शरद घोगरे, सचिव ॲड योगेश देवकर, खजिनदार ॲड सोमनाथ फुलसुंदर, ग्रंथपाल ॲड. भालचंद्र कुलकर्णी, महिला प्रतिनिधी ॲड. तेजस्वी वीर मॅडम, सदस्य ॲड. आप्पासाहेब शिंदे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. माधवराव शितोळे देशमुख, वनसंरक्षक पुरस्कार विजेते ॲड. सचिन राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष ॲड तेजसिंह आप्पा पाटील, कार्यध्यक्ष महारुद्र बाप्पू पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोलशेठ भिसे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, ज्येष्ठ ॲड. कृष्णाजी यादव, ॲड मनोहर नाना चौधरी व इंदापूर बार असोसिएशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा