Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

*तुळजापूर तालुक्याची दशा... भविष्यातील दिशा व येणाऱ्या विधानसभेबद्दल ग्रामीण भागातील उलट चर्चांना ऊत*

 


*तुळजापूर तालुका,प्रतिनिधी*

 *चाँदसाहेब शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पारावर , वट्यावर , चौकाचौकात , चहा व पान टपरीवर युवा वर्गातून तुळजापूर तालुक्याची दशा व भविष्यातील दिशा कोणाकोणाला उमेदवारी मिळणार , कोण कुठे जाणार , कोण अपक्ष लढणार याबाबत खमंग चर्चा घडत असून भविष्यातील राजकिय घडामोडीवर पैजाही लागत असल्याचे ऐकावयास मिळत आहे 

        तुळजापूर तालुक्याची ओळख राज्यभर कूसळी तालुका म्हणून होती परंतु ती कूसळी तालुका ओळख पुसण्याचे काम तालुकाभर अनेक साठवण व पाझर तलाव करून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले असून तालुक्याचे नंदनवनात रूपांतर केले आहे व त्यांना तालुक्यातील सुजाण जनता कदापिही विसरणार नाही तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील व तेच निवडून येतील असे त्यांच्या समर्थक युवकांतुन बोलले जाते तर शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी व बेरोजगार युवकांच्या न्याय हक्कासाठी व जिल्ह्यात उद्योग धंदे सुरू व्हावेत यासाठी सतत प्रयत्नशील करणारे व राज्य शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवणारे माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील व तेच निवडणूक जिंकतील असे त्यांच्या समर्थक युवकांतुन बोलले जात आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून देवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी शेतमजूर युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनास धारेवर धरणारे देवानंद रोचकरी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून आत्तापर्यंतच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे तालुका भकास झाला असून देवानंद रोचकरी सक्षम पर्याय असतील व तेच विजयी गुलाल उधळतील असे देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक म्हणत असल्याचे ऐकावयास मिळत आहे तसेच या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असून सामुदायिक विवाह सोहळे , देवदर्शन व विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवणारे अशोक जगदाळे हेच यावेळी बाजी पलटणार व विजयी मिरवणूक काढणार असे त्यांच्या पक्षातीलकार्यकर्ते ब समर्थकांतुन बोलले जात आहे महाविकास आघाडी युवकांना संधी देणार असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना उमेदवारी मिळेल व ते विजयी होतील असाही दावा त्यांच्या समर्थकांतुन केला जात आहे काही युवक दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव व लोकमंगलचे चेअरमन रोहन देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशअध्यक्ष सक्षनाताई सलगर यांच्याही नावाची चर्चा करत असल्याचे ऐकावयास मिळत आहे तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा आम्ही ताकदीने लढून लोकसभेप्रमाणे घवघवीत यश संपादन करून तुळजाभवानीच्या दरबारी शिवसेनेचा भगवा फडकावू असे युवासेनेचे प्रतीक रोचकरी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्येष्ठ , कडवट शिवसैनिक कमलाकर चव्हाण यांच्या समर्थकांतुन व शिवसैनिकांतुन बोलले जात आहे

  याशिवाय तालुक्यातील आतापर्यंतची दशा व पुढील काळातील दिशा मनसे , वंचित बहुजन आघाडी व बच्चू कडू यांच्या प्रहार समर्थक कार्यकर्ते यांच्याकडूनही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत व विविध प्रकारच्या पैजा लावण्यात येत आहेत येणाऱ्या विधानसभेसाठी कुणाची युती-आघाडी राहते कुणाकुणाला उमेदवारी मिळते कोण कोण अपक्ष लढणार हे येणाऱ्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे समर्थक कार्यकर्त्यांनी लावलेल्या पैजा देणार का?हेही पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा