Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

*सांगली येथे '15 आॕगस्ट स्वतंत्र दिना 'निमित्त आयोजित - रांगोळी स्पर्धेत -"समा इक्बाल मुल्ला "हिने पटकावला प्रथम क्रमांक*



 *उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना "वाव" मिळावा, कलासक्त जीवनपद्धतीबद्दल आकर्षण निर्माण व्हावे,आणि 21 व्या शतकातील आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या उदात्त  दृष्टीकोनातून सांगलीतील संजोग कॉलनीमध्ये 

"15 ऑगस्ट रोजी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री.सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली मंडळ हे स्पधेचे आयोजक होते.

यावेळी  रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. रांगोळी स्पर्धेमध्ये समा  इकबाल  मुल्ला हिने प्रथम क्रमांक पटकावला. चित्रकला, रांगोळी आणि आर्ट मध्ये "विशेष प्राविण्य"  असणाऱ्या समा हिने आत्तापर्यंत कित्येक "पुरस्कार"  पटकावले आहेत.



प्रभाग क्रमांक 16 चे माजी नगरसेवक मयूर पाटील, तोफीक शिकलगार* यांनी "समा" हिच्या यशाबद्दल घरी येऊन पुष्पगुच्छ  देऊन शुभेच्छा दिल्या.त्याशिवाय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते जब्बारभाई बारसकर, नगरसेविका सुनंदा राऊत यांचे चिरंजीव,  सुजित राऊत  यांनीदेखील समा हिला "दूरध्वनी" वरून शुभेच्छा दिल्या. 

या स्पर्धेचे निखिल  चोपडे,  महेश मठद, गणेश मठद, अमर जवळेकर  हें स्पर्धेच्या बक्षिसाचे मुख्य प्रायोजक होते. 

पर्यावरणचा महत्वाचा मुद्दा दृष्टीक्षेपात ठेवून रांगोळी स्पर्धेत पर्यावरण स्वछता अभियान आणि संस्कार भारती हे विषय होते. चित्रकला स्पर्धेत पक्षी व झाड ,निसर्गचित्र ,पर्यावरण स्वछता ,पाने व फुले हें विषय होते.

स्पर्धेचा  पारितोषिक  वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.कांतीलाल पुरुषोत्तम विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. विनोद खाडे यांनी "पर्यवेक्षक"  म्हणून "चोख" काम पाहिले.

स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवणारे विद्यार्थी ! 

♦️ रांगोळी स्पर्धा 

समा इकबाल मुल्ला,किरण दीपक भोई,प्राजक्ता सुहास फडतरे,भारती संजय पवार, कृतिका श्रीप्रसाद चोपडे 


लहान व मोठा गट

   *1) राही चव्हाण,आरुष माळी, आद्या सूर्यवंशी

  *1 ली ते 2 री 

वरद भगरे,हर्षवर्धन गवळी,हृदयांशी संकपाळ,

   * 3 री ते 4 थी 

नाविन्या लोकापुरे ,स्नेहल वडपे,सोहम सरगर,

    * 5वी ते 7वी 

काव्या लोकापुरे,स्वराली कदम, प्रांजल जोशी,

      * 8 वी ते 10 वी 

वेदिका पाटील अक्षरा चौगुले,कल्पिता कारकुटे.

15 ऑगस्ट चा हा *आनंदसोहळा* उत्साहात पार पाडण्यासाठी "संजोग कॉलनीच्या" कार्यकर्त्यांनी  उत्स्फूर्त योगदान दिले. यामध्ये , गणेश मठद, निखिल चोपडे, महेश मठद, अमर जवळेकर, मयुरेश मठद, सुधीर पाटील,जुनेद जमादार, गणेश चोपडे, बळवंत डोंगरे,  अभिषेक जवंदाळ, प्रतीक भगत, शुभम पवार, राजू बाबर, यशवंत माने,  प्रमोद जवळेकर आदी. 


. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा