*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
पुणे - 26 ऑगस्ट :* आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 25) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. अनुष्का सुहास केदार (वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली.
दरम्यान, हे पाहताच तेथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अनुष्का केदार वाहून गेल्या, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दल हे अनुष्का यांचा शोध घेत आहेत.
अनुष्का यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा