*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
जगात रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे रक्तदान करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना कधी ही रक्ताची आवश्यकता भासेल हे सांगता येत नाही.रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा प्राण वाचला जातो.सध्याच्या युगात कृत्रिम रक्त तयार होत नसल्यामुळे मानवाचे रक्त उपयोगात येते.पै.अक्षय जाधव यांनी वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला आहे.असे प्रतिपादन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील केले.
अकलुज येथील जयसिंह चौकात पै.अक्षय जाधव यांचे वाढदिवसानिमित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये 202 रक्तदात्याने सहभाग येऊन रक्तदान केले. यावेळी पै.अक्षय जाधव समाजिक कार्यकर्ते जावेदबाबा तांबोळी,बापू जाधव,गोल्डन जाधव,नितिन जाधव उपस्थित होते.ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांनी रक्त संकलन केले.डाॅ. चंद्रकांत ढोबळे,चंद्रकांत गायकवाड,ज्ञानेश्वर ढोंबळे,अमीर मुलाणी,हंनुमंत माने यांनी रक्त संकलन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा