*सांगली ----पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो ;--8983 587 160*
सर्वप्रथम "प्रेषित मोहम्मद पैगंबर " यांच्याबद्दल "अपशब्द" बोलणाऱ्या ढोंगी बाबाचा" जाहीर निषेध "!!!
भारताची सत्ता मिळवायची तर मर्दासारखे पुढे या.. मुस्लिमांची ढाल केल्याशिवाय ,मुस्लिमांचे नावं घेतल्याशिवाय तुम्हांला "सत्ता" मिळणार नाही का ??? सत्ता मिळण्यासाठी मुस्लिम एक मोहरा आहेत का ?? सत्तेसाठी मुस्लिम सोडून कोणत्याही दुसऱ्या धर्माचा वापर का होत नसावा ??? पाकिस्तान हा मुस्लिमांचा देखील शत्रू आहे. "अफजलखान" ला "छत्रपती शिवाजी महाराजांनी" "ठार" मारले. पण कोणत्याही "मिरवणुकीत" अफजल खान आणि पाकिस्तान च्या "घोषणा" देत तुम्ही काय "सिद्ध" करत आहात ?? मुस्लिमांना भारताचा शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानशी काही देणे ना घेणे ! पाकिस्तान वर अणुबॉंब टाकला तरी मुस्लिमांना काय फरक पडणार ??? पण जाणीवपूर्णक अशा घोषणा द्यायच्या आणि मराठा - बहुजन बांधवांच्या मनामध्ये संशयकल्लोळ निर्माण करायचा हा "डाव" असतो. पोलीस अशा घोषणा देणाऱ्यांवर आणि त्यांच्या संघटनेवर "कारवाई" का करत नाहीत ??? रस्त्यावर जाणीवपूर्वक अशा घोषणा देणे सामाजिक "सलोखा" बिघडवणाऱ्या आणि आपत्तीजनक ठरत नाहीत का ??? अशा घोषणा देणारे "मराठा आरक्षण मोर्चा " मध्ये कधी #सामील होतात का ??? मराठा - बहुजन बांधवानी याचा गांभीर्याने "विचार" करावा!
*मुस्लिम म्हणजे एक "मोहरा"*!
भिकारी ज्याप्रमाणे "देवाच्या" नावावर किंवा अल्लाह के नाम पे दो ...असे म्हणतो ,तेंव्हा परमेश्वरा ला स्मरुन माणूस 5 - 10 रुपये देतो ..तशाच प्रकारे सत्ता पाहिजे ?? घ्या मुस्लिमांचे नावं ..महाराष्ट्र ,हरियाणा , झारखंड राज्यात "पराभव" होणार... तर घ्या मुस्लिमांचे नावं ...400 पार आणि स्वतःची गॅरंटी चा नारा दिला असताना पण 300 पार झाले नाही,तर घ्या मुस्लिमांचे नावं !
तात्पर्य सरकार स्थापनेसाठी, पंतप्रधानपद मिळवण्यासाठी ,मुखमंत्रीपद मिळवण्यासाठी, राजकारणासाठी "धार्मिक ध्रुवीकरण" करण्यासाठी प्रत्येक वेळी मुसलमानचं लागतो काय??? "अन्य धर्मिय" भाषिकांचे नावं घेऊन राजकारणात "यशस्वी" होता येत नाही का ??? मुस्लिमांच्या शिवाय तुमचे "पान" हलत नाही का ???
*विकास,बेरोजगारी आणि महागाई याबद्दल "चिडीचूप "!*
आज जातीय विषवल्ली समाजात निर्माण करून हिंदू - मुस्लिम यांच्यातील सर्वधर्मसमभावाचा जो मिलाफ आहे त्याला तडा देत "मते" मिळवण्याचा जो प्रकार सुरु आहे तो निषेधार्ह आहे.
विकास,महागाई आणि बेरोजगारी* याचा बिमोड करून माझ्या भारताला स्वर्गासारखे चांगले आणि "विकासाभिमुख" देश बनवा ..! भारतातील गरिबी हटवण्यासाठी, बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही *व्हिजन* का नाही .?? प्रत्येक वेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या तयार करून हिंदू - मुस्लिम जातीय तणाव करून तुम्ही काय सिद्ध करत आहात ??? सत्तेसाठी हपापलेल्या जातीयवादी पक्षाने ,सत्ता भोगण्यासाठी मुस्लिमांची शिडी वापरणे आता बंद करावे.
*भारतीय मुस्लिम धर्मगुरू "सर्वधर्मसमभावाचे" पाईक !*
भारतातील कोणत्याही मुस्लिम धर्मगुरूं कडून कधीही अन्यधर्माबद्दल "आक्षेपार्ह" विधान होत नाही. भारतातील प्रत्येक धर्मगुरू - आलिम - हाफिज हें
सर्वधर्मभाव आणि एकोपा ,सामाजिक बंधुता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करतात. भारत देशाशी,या पवित्र मातीशी प्रत्येक मुस्लिम "एकनिष्ठ" आहे. भारतातील शांतताप्रिय मुस्लिम कधीही प्रत्युत्तर देत नाही. असे असताना प्रत्येक वेळी मुस्लिमच "*टारगेट* का ???
महाराष्ट्र आणि भारतातील कित्येक शहरात "जातीपातीचे" राजकारण पेटत ठेवत ,मुस्लिमांच्या दर्गा- -मस्जिद आणि वक्फ बोर्ड अशा प्रकारचे मुद्दे काढत तेढ निर्माण करण्याचे "बालिश" प्रकार सुरु आहेत.
विशाळगड दर्गा मध्ये जो प्रकार झाला तो निषेधार्ह होता. मस्जिद -दर्गाहच्या तोडफोडच्या प्रकरणात दंगलखोरांना शिक्षा झाली. ??? 16 वे "थेट वंशज" असणारे उदयनराजे महाराज हें खरे "वारस" आहेत. डुप्लिकेट वारसांकडून कधीच "न्यायाची" अपेक्षा करायची नसते. तात्पर्य काय ..तर "राजकारणासाठी " प्रत्येकवेळी मुस्लिमांचा ढाल म्हणून वापर करणार का ??? सत्ता मिळवण्यासाठी ,मुस्लिमांना प्यादे म्हणून पुढे करण्याची "कूटनीती" आता जगजाहीर झाली आहे.
हिंदू -मुस्लिम केल्याशिवाय राजकारण करता येत नाही हें सर्वश्रुत झाले आहे. सत्तेपर्यंत जाण्यासाठी "मुस्लिम" एक "मोहरा" म्हणून वापर होत आहे. त्यामुळे मर्दासारखे विकास, महागाई आणि बेरोजगारी नष्ट करून सत्तेपर्यंत जा .समस्त भारतवासीयांच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा