*सांगली-----पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो-8983 587 160*
गरजवंताना अक्कल नसते ही "रूढ" म्हण आज बेरोजगार तरुण - तरुणींना तंतोतंत लागू होते. दुनिया झुकती हें ..सिर्फ झुकानेवाला चाहिये..या उक्तीनुसार सांगली जिल्ह्यात बेरोजगार तरुणीं - तरुणांना नोकरी देण्याचे "प्रलोभन" दाखवत , 40000 ते 50000 रुपये उकळत कालांतराने चेन सिस्टीम च्या माध्यमातून पुन्हा नवीन मेम्बर करा असे सांगत "फसवणूकीचे" प्रकार सुरु आहेत. वार्षिक 25 कोटी मिळवण्याचे हें एक "रॅकेट" आहे असा "कयास" आहे.
जिल्ह्यातील या कंपन्यांचे यामधील प्रमुख मालक जे असतील त्यांच्यापर्यंत "पोलिसांना" पोहचावे लागेल. तरच अशा बोगस कंपन्यांना "चाप" बसेल.
आत्तापर्यंत बोगस असणाऱ्या या कंपनीने किती बेरोजगार तरुण - तरुणींना नोकरी दिली ??? याची माहिती पोलीस अधीक्षकांनी घ्यावी. ऍडमिशन किती झाले??? आणि "जॉब" (नोकरी ) किती बेरोजगारांना मिळाली ??? याची "खातरजमा" व्हायलाचं हवी.
काही महिन्यापूर्वी मी सांगलीतील 100 फुटी रोडवर "नोकरी" देणाऱ्या स्कँडल बद्दल "लेख" लिहून " भांडाफोड" केला होता. त्याचे प्रत्यंतर आता येत आहे.
माझी निडर - सडेतोड आणि प्रामाणिक पत्रकारिता समाजप्रबोधन करते हें पुन्हा एकदा "सिद्ध" झाले आहे.
चेन सिस्टीम प्रमाणे तरुण -तरुणींना एकत्र बोलावून त्यांना विविध प्रलोभने दाखवून, करोडपती होण्याची "स्वप्ने" दाखवून त्यांच्या विश्वासाचा "गैरफायदा" घेत,मूर्ख बनवण्याची फॅक्ट्री सांगली सह जिल्हयात 4 ठिकाणी असल्याचे समजते.
गरजेनुसार कुणाकडून 40000 कुणाकडून 47000 अशी रक्कम घेत नोकरी मिळणार असे प्रलोभन दाखवत 3-4 महिने त्यांच्या भावनांशी खेळत समोरच्याची गरज पहिली जाते. त्यानंतर चेन सिस्टीमचा खरा "खेळ" सुरु होतो.एका तरुणाने किंवा तरुणीने प्रत्येकी 1-1 नवीन मेम्बर जोडायचा. त्याचा करारही त्यादोघांनीचं करायचा. त्यात कंपनी प्रत्यक्ष भाग घेत नाही. त्याच्याकडुन 50000 किंवा अन्य रक्कम घ्यायची असा काहीसा प्रकार घडतं आहे. तेथील प्रत्येक तरुण एकमेकांशी अशाप्रकारे "जोडला" गेला आहे.
जर एका वर्षात 5000 तरुण - तरुणींकडून 50000 प्रमाणे पैसे घेतले असतील तर त्याची रक्कम ही 25 कोटी रुपये इतकी मोठी होते. हें फार "मोठे" स्कँडल पोलीस अधीक्षकांनी उध्वस्त करणे गरजेचे आहे.
सांगली जिल्ह्यात अनेक तरुण -तरुणी या स्कँडल मध्ये फसलेले आहेत. आणि आजदेखील फसतं आहेत. अनेक भूलथापा देऊन , कुणाला काहीही न सांगण्याच्या अटीवर /शपथेवर तेथे सध्या अनेक तरुण - तरुणी नोकरीं मिळेल या आशेवर थांबून आहेत.
सांगली जिल्ह्यात प्रामाणिक आणि खरोखर नोकरीं देणाऱ्या प्लेसमेंट च्या कंपनी आहेत. ते प्लेसमेंट बेरोजगारांना खरोखर नोकरी देते. त्या प्रामाणिक "प्लेसमेंट" चालकांचे अभिनंदन करायला हवे.परंतु तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे करणे ही काळाची गरज आहे.
ज्यांना -ज्यांना बोगस कंपनीचा असा अनुभव आला आहे त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा .
भविष्यात नोकरीं लावण्याचा हा गोरखधंदाबंद व्हायला हवा ,तरुण -तरुणींची पिळवणुक थांबायला हवी. आतापर्यंत जितके बेरोजगार तरुण -तरुणी फसले असतील त्यांना त्यांनी भरलेले पैसे मिळाले पाहिजेत. हाच त्यांना खरा न्यायअसणार आहे .
इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा