*सांगली------पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो;--8983 587 160
वेळ रात्री 9 ची. पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सर्वांची "लगबग" सुरु होती. एका दवाखान्यात मी कामानिमित्त गेलो होतो. तेवढ्यात एक बुरखाधारी मुस्लिम महिला आणि त्यांचे नातेवाईक गडबडीत दवाखान्यात आले. महिलेच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. नातेवाईक रडत होते. वातावरण धीरगंभीर झाले होते. दवाखान्यातील OPD मध्ये काय झाले हें कोणालाच कळेनासे झाले. मी महिलेला विचारले काय झाले??? तेंव्हा त्यांनी, डॉल्बीच्या दणदणाटामुळे "रॅक" वरील मोठे भांडे डोक्यावर पडले आहे असे त्यांनी सांगितले. रक्त वाहत होते, डोक्टरांनी तात्काळ त्यांना OPD मध्ये घेतले व "उपचार" सुरु केले.
डोक्यावर रक्त आल्याने मी देखील भयभीत झालो, कारण डोक्यावर रक्त येत असेल आणि जर उलटी झाली तर त्या पेशंटची प्रकृती चिंताजनक होऊ शकते हें मला माहित होते. कारण डोक्याला जोरात मार लागल्यास मेंदूला सूज येते व तात्काळ उलट्या सुरु होतात व प्रकृती गंभीर ?
नेमके झालेही तसेच! , 1 मिनिटात त्या महिलेने दवाखान्यात उलटी केली.आणि पाठोपाठ सलग "3 उलट्या" केल्या. डॉक्टरांनी सिटी स्कॅनचा सल्ला दिला.पेशन्टला बहुदा उलटी झाल्यावर काय होते ??? त्याचा परिणाम होतो ?? याची "पूर्वकल्पना" असावी म्हणून त्यांनी रडायला सुरवात केली. "परमेश्वरावर" विश्वास ठेवा काही होणार नाही असे सांगत मी त्यांना व नातेवाईकांना धीर दिला. तरीदेखील परिस्थिती आणि होणाऱ्या परिणामाबद्दल सर्वांनाच "धास्ती" होती.
डॉल्बीचा दणदणाट कधी थांबणार ??
80 डेन्सीबल पेक्षा जास्त आवाज असेल तर कर्णबधिरता येते,"कानाला" ऐकू कमी येते, हृदयविकारचा झटका येऊ शकतो. ब्लडप्रेशर वाढू शकते . कित्येक तरुण - वृद्ध डॉल्बीच्या आवाजाने मरण पावले आहेत. लोकांना मरण देणाऱ्या आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या जास्त डेन्सीबल च्या डॉल्बीवर कधी बंदी येणार ???
मागील 5 वर्षात मिरवणुकीत 140 पर्यंत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डॉल्बीचालकांवरील गुन्हे "शाबूत" आहेत का ?? पोलिसांचे दुर्लक्ष आणि समाजाची नसलेली जागरूकता यामुळे काल झालेल्या प्रकारांसारखे असंख्य प्रकार घडतं असतात. जनतेने देखील सामूहिक जबाबदारी समजून जास्त आवाजाच्या डॉल्बीसंदर्भात पोलिसांना फोन करून माहिती दिली पाहिजे.
80 डेन्सीबल पर्यंत डॉल्बी ऐकणे कानाला आणि मनाला समाधान देते.
मग कर्णकर्कश आवाजाचा हट्ट का ??? तरुण लाखो रुपये खर्च करून डॉल्बी विकत आणतात .डॉल्बी बंद केल्यास त्यांच्या
पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यांच्या "रोजगारावर" गंडांतर येऊ शकते त्यामुळे कमी आवाजात डॉल्बी लावणे हादेखील एक "स्वागतार्ह पर्याय" होऊ शकतो. प्रश्न हा आहे,कर्णकर्कश डॉल्बी आणखी किती बळी घेणार ???
या लेखामधील या घडलेल्या उदाहरणाप्रमाणे कित्येक घरात अशा दुर्घटना घडतात ..तेंव्हा अशा 120 - 40 डेन्सीबल आवाज ठेवणाऱ्या,आणि जनतेला "मरणयातना" देणाऱ्या डॉल्बीचालकांना वेसण कसे घालणार ???
"पोलीस - महाराष्ट्र शासन " यांनी "उदासीनता" झटकून या महत्वपूर्ण आणि गंभीर विषयात लक्ष "केंद्रित" करतील अशी आशा आहे .
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा