*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
अकलुज ता.माळशिरस येथील जुलेखा बाबुलाल पठाण यांची जल संपदा (पुणे विभाग परीमंडळ) येथे सहाय्यक स्थापत्य अभियंतापदी निवड झाली असुन
जलसंपदा विभागाच्या वतीने 31 डिसेंबर 2023 रोजी सहा.स्थापत्य अभियंता पदासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेण्यात आली होती.सदर परीक्षेचा निकाल 31 जुलै 2024रोजी जाहीर झाला.त्यामध्ये अकलुजची कन्या कु.जुलेखा बाबुलाल पठाण यांनी यशश्री खेचुन आणली आणि तिची जलसंपदा सहाय्यक स्थापित अभियंता पदी ( पुणे विभाग परिमंडळ.) निवड झाल्याने सर्वञ तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जुलेखा पठाण या अकलुज येथील सदुभाऊ चौकातील "कोमी झेरॉक्स सेंटर "चे बाबुलाल पठाण यांच्या कन्या असुन अलीकडच्या काळात मुलापेक्षा मुली सुद्धा काही कमी नाहीत आणि प्रत्येक पित्याला अशा मुली बाबत गर्व असावा याबाबत दुमत असल्याचे कारण नाही
*जुलेखा बाबुलाल पठाण हिचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक स्थापत्य अभियंता पदी निवड झाल्याबद्दल" टाइम्स 45 न्यूज "(अकलुज) परिवाराच्यावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा