*अकलूज प्रतिनिधी*
*किरण सुर्यवंशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील महिला वसतिगृह अकलूज
रत्नाई महिला संकुलाच्या वतीने
७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण समारंभ प्रमुख अतिथी अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक
करिश्मा महादेव वणवे तसेच प्रशाला समिती सदस्या लतिका जावळे, ज्योती मगर, स्नेहल नरूळे,यशवंत माने-देशमुख पर्यवेक्षक रूपाली मिसाळ अधिक्षिका,
डॉ. राहूल सुर्वे प्र. प्राचार्य,
सुनिता वाघ मुख्याध्यापिका
यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत, पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले़ राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत सादर झाले. एम सी सी, आर एस पी, गर्ल गाईड, स्कूल बटालियन यांच्या संचलन पथकाने मानवंदना दिली. संचालन पथकाचे नेतृत्व समृद्धी बाबर हिने केले. शिस्तबद्ध सामुदायिक कवायत व देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात देशभक्तीची भावना हृदयावरती कोरली गेली.
संकुलातील ज्ञानेश्वरी शिंदे व अमृता मगर यांनी देशभक्तीपर विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक लतिका वनवे स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाल्या की भारत समृद्धी आणि संस्कृतीचा देश आहे. या भारतात आपण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. सायबर गुन्हे त्याचबरोबर मोबाईलचा अतिरेक याविषयी प्रबोधन केले कार्यक्रमाचा सांगता समारोह "सारे जहाँ से अच्छा" या देशभक्तीपर गीताने झाला. भारत माता की जय,वंदे मातरम या गगनभेदी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
या 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी पालक बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा