श्रीपूर---बी.टी.शिवशरण
*अकलूज येथील जुन्या एस टी स्टँड मध्ये पावसाच्या पाण्यामुळे साचल्याने असे तळ्याचे स्वरुप आले आहे या स्टँडवरुन श्रीपूर, माळखांबी ,बोरगाव, पंढरपूर, जांबूड, नेवरे ,टेंभुर्णी ,संगम, बाभूळगाव तसेच लांब पल्ल्याच्या श्रीरामपूर नाशिक संगमनेर शिर्डी हदगाव ,साठी एसटी बस सोडल्या जातात एसटी बस आली की पावसाळी पाण्याच्या तळ्यात उभी करावी लागते प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून एस टी मध्ये प्रवेश करावा लागत आहे ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनुभवायला मिळते मात्र एस टी प्रशासन या जुन्या एस टी स्टँड परिसरात काँक्रिट करत नाही हे दुर्दैव आहे असुन आणखी किती काळ प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे हा मुळ प्रश्न आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा