*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शिवजन्मभूमी जुन्नर (पुणे) येथे जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या विद्यमानाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कु. प्रांजल दिपाली उद्धव चव्हाण हिने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याबाबत प्रांजल ला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देण्यात आले आहे.
प्रांजल ही मूळची देवताळा लातूर येथील असून इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल शाळे मध्ये ती इयत्ता 3 री मध्ये शिकते. प्रांजल ने राजमाता अहिल्याबाई होळकर या विषयावर आपले मनोगत मांडताना राजामाता अहिल्याबाई विषयी मंत्रमुग्ध करणारे भाषण केले. प्रांजल ला तिच्या गटामध्ये तिसरे क्रमांक मिळाले. महत्वाचे म्हणजे प्रांजल ने सलग तीन वर्ष या स्पर्धे मध्ये पारितोषिक पटकवले आहे.
प्रांजलच्या या यशाबद्दल तिचे वडील बोलताना म्हणाले की, आपले मुले हे चौरंगी चिरा असले पाहिजे. समाजामध्ये वावरताना त्याला सर्व बाजूची माहिती असायला हवी. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असले पाहिजेत. मुलांना चार लोकांमध्ये उभे राहून आपले विचार व्यवस्थितपणे मांडता आले पाहिजे. म्हणतात ना बोलणाऱ्याची माती विकली जाते व न बोलणाऱ्याचे सोने देखील विकले जात नाही त्यामुळे मुलांना बोलतो करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा हे खूप चांगले माध्यम आहे.
प्रांजल चे व्यक्तिमत्व देखील अशीच आहे. प्रांजलला पोहणे, संगीत, नृत्य, स्केटिंग, गिर्यारोहण, अबॅकस, जिम्नास्टिक यामध्ये आवड असून आतापर्यंत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचे तब्बल अकरा रेकॉर्ड झाले आहेत. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रांजल ने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे समाज माध्यमातून कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा