Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

*जनावरांचे मांस विक्री साठी वाहनातुन घेऊन जात असताना पकडून "अकलुज पोलिसा" कडून कारवाई--अज्ञात लोकाविरुध्द गुन्हा दाखल*


 *टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

जनावराचे मांस विक्री करण्याकरिता चारचाकी वाहनातुन जात आसताना 

अकलुज पोलिसाकडून पकडून अज्ञाता विरोधात कारवाई करण्यात आली त्याबाबत अकलुज पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी कि 

दिनांक 02/08/2024 रोजी 00.30 वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना, यशवंतनगर बीटमधील माळेवाडी ता. माळशिरस परिसरात जनावारांची कत्तल करून सदर जनावारांचे मांस हे विक्री करणेकरीता एका वाहनामध्ये घेवुन जात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळल्याने लागलीच त्यांनी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हवालदार चंद्रकांत कुंभार, राजेंद्र ठोंबरे, सचीन डुबल यांना सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सांगितल्याने सरकारी वाहनाने सदर ठिकाणी जावुन सदर वाहनाचा बॅटरीचे उजेडात शोध घेतला असता सदरचे वाहन पंचशीलनगर मोरेवस्ती माळेवाडी ता. माळशिरस येथील एका पडिक शेतातील पत्राचे शेड समोर एक पांढ-या रंगाचे महिंद्रा कंपनीचे पिकअप दिसले त्यावेळी बॅटरीचे उजेडात सदर वाहनाचा नंबर पाहिला असता एम एच 11/ डी डी 6035 असा होता. बातमीतील आशयाप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणाकडे जात असताना सदर पिकअपची चावी काढुन तो अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. सदर वाहनामध्ये उग्र स्वरूपाचा वास येत असल्याने बॅटरीचे उजेडात सदर वाहनाचे हावदयामध्ये पाहिलेवर पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीकच्या गव्हाच्या साळी भरलेल्या पिशव्या व त्याचे खाली पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीकच्या गोन्यामध्ये जनावरांचे मांसाचे तुकडे तसेच जनावरांचे मांसाचे लहान मोठे तुकडे ते बर्फात ठेवलेले दिसले. त्यावेळी अंधार असल्याने सदरचे पिकअप वाहन व त्यामधील जनावारांचे मांस पुढील कायदेशीर कार्यवाही करने करीता ताब्यात घेवुन वाहन पोलीस ठाणे आवारात आणुन दोन पंचांना पोलीस उपनिरीक्षक खारगे यांनी बोलावुन घेवून पिकअप वाहन क्रमांक 11 डी डी 6035 यामधील जनावारांचे मासाचे वजनकाटा धारका मार्फत वजन काट्यावर मोजमाप केले असता   

1 46,800/- रु.कि.च्या 8 पांढ-या रंगाचे प्लॅस्टीकचे गोन्या त्यामध्ये 312 कि.ग्रॅ. जनावारांचे मांस प्रती किलो किं.अं.150 रू . दराने

2 1,33,500/-रू. कि. चे पिकअपचे हौदामध्ये जनावरांचे मांसाचे सुटटे असलेले लहान मोठे एकुण 890 कि.ग्र. वजनाचे तुकडे प्रती किलो किं.अं.150 रु. दराने तसेच 

3 3,00,000/- रु. कि. चे एक पांढ-या रंगाचे महिंद्रा कंपनीचे चारचाकी पिकअप त्याचा आर टी ओ नं. एम एच 11/ डी डी 6035 असा असलेला जु.वा.किं.अ.

--------------

4,80,300/- कि.अं. एकुण येणे प्रमाणे 

 सदर पिकअप वाहन क्रमांक एम एच 11/ डी डी 6035 चा चालक हा बेकायदेशीररित्या जनावारांची कत्तल करून ते बेकायदेशीररित्या विक्री करणेकरीता घेवून जात असता पोलीसांची चाहुल लागता सदर वाहनाची चावी काढुन पळुन गेल्याने पिकअप वाहन क्रमांक एम एच 11/डी डी 6035 चा चालक व त्या संबंधी हित संबंध असणा-या इतर अज्ञात लोकांविरूध्द भारतीय न्यायसंहीता कलम 325, 3(5), सह महाराष्ट्र प्राणी संरंक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 5(क), 9 अन्वये पोलीस नाईक सचीन डुबल यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे.  

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक षिरीश सरदेषपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, नारायण षिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, अकलूज, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्षनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस हलवदार राजेंद्र ठोंबरे हे करीत आहेत.

 


पोलीस निरीक्षक,

अकलुज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा