*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती येथे गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पार पडला. ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय किर्तीचे कृषी शास्त्रज्ञ, ॲल्युमिनी असोसिएशन ऑफ अग्रिकल्चर, पुणे या संस्थेचे सचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोग संशोधक, संचालक प्रा. डॉ. जनार्दन राजाराम कदम साहेब यांच्या हस्ते तसेच सर्जेराव राजाराम कदम, सभापती स्थानिक व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वेताळ काटकर वेताळ घुले व दादा यादव तसेच बागेवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच संगीता अवघडे, प्रशालेचे मुख्याध्यापक . प्रताप तोरणे सर व प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक भानुदास आसबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. _"स्वातंत्र्याचा दिन हा आला, नवचैतन्य घेऊनिया, उधळू या रंग तिरंगी, चौफेर या मंगलमय स्वातंत्र्यदिनी" या_ उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत याचे गायन केले. याप्रसंगी प्रशालेतील स्काऊट व गाईड या ग्रुपने बहारदार असे संचलन केले व सर्वांची मने जिंकली. प्रा. डॉ. जनार्दन कदम यांनी स्काऊट गाईड ग्रुप ची मानवंदना स्वीकारली. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सृष्टी चिकणे हिने स्काऊट व गाईड ग्रुपचे लीडरशिप केले. स्काऊट पथकाचे नेतृत्व चि. प्रणव लोखंडे याने केले. या दोन्ही ग्रुप ना प्रशालेचे सहशिक्षिका कल्पना मोरे मॅडम व शाहेजाफर सय्यद व श्री. रवींद्र गुरव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशालेतील इ. १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घोषपदकाच्या तालावरती सुसूत्रबद्ध व तालबद्ध अशी कवायत सादर केली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रताप तोरणे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले अशा सर्व महात्म्यांना विनम्र अभिवादन करून शाळेतील विविध उपक्रम व अंतरंगाची माहिती सांगितली. यानंतर "अतिथी देवो भव" या उक्ती प्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच ज्यांनी इस्राईल, अमेरिका, मेक्सिको, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, स्पेन, जर्मनी येथे झालेल्या कृषी परिषदेत आपल्या कार्याचा व देशाचा ठसा उमटवणारे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवणारे कृषी संशोधक तसेच एस एस सी मार्च 2024 च्या बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 5000 4000 व 3000 रुपये बक्षीस देणारे प्रा. डॉ. जनार्दन राजाराम कदम साहेब यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी आशा जनार्दन कदम यांचाही यथोचित सत्कार कल्पना मोरे मॅडम यांचे हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर प्रशालेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती सर्जेराव कदम यांचा सत्कार प्र. पर्यवेक्षक . धर्मराज दगडे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वेताळ काटकर वेताळ घुले . दादा यादव यांचाही सत्कार प्राथमिक विभागाचे प्र मुख्याध्यापक . भानुदास आसबे सर यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यानंतर "शरीर माध्यम खलू धर्म साधनम" या उक्तीप्रमाणे योग म्हणजे एकाग्रतेकडून प्रसन्नते कडे नेणारा मार्ग, मनाची शांतता ठेवण्याचे साधन, योगामुळे मानवी शरीर, मन, आत्मा यांना ऊर्जा व सौंदर्य मिळते हे दाखवण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गीताच्या बोलावर सूर्यनमस्कार, वृक्षासन, पर्वतासन, गरुडासन, त्रिकोणासन, पद्मासन, अर्धचक्रासन ,वज्रासन, बलासन अशा विविध प्रकारची योगासने सादर केली या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे सहशिक्षक . दादा ढोले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भारत हा विविधतेत एकता असणारा धार्मिक, सहिष्णुता, संस्कृतीचे दर्शन घडवणारा देश आहे. या देशाला समुद्र, नद्या, पर्वत, जंगले, सरोवरे ही संपत्ती आणि वारसा लाभलेला आहे भारत देश म्हणजेच थोर संतांची, वीर पुरुषांची, क्रांतिकारकांची, वीर जवानांची आहे. भारत मातेचे गुणगान व तिला वंदन करण्यासाठी प्रशालेतील 30 विद्यार्थिनींनी देशभक्तीपर कृती गीत सादर केले या सर्व विद्यार्थिनींना प्रशालेचे सहशिक्षक श्री. महादेव आठवले सर, देशमुख मॅडम कु. चिंतामणी मॅडम कु . शीला धाइंजे मॅडम यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. यानंतर प्रशालेतील प्राथमिक विभागाची विद्यार्थ्यांनी कु. श्रुतिका पांडोळे इयत्ता चौथी व कु श्रेया काटकर इयत्ता चौथी यांनी इंग्रजी व मराठीतून आपले विचार प्रकट केले. तसेच कु. प्राजक्ता विनोद गवसने इयत्ता आठवी या विद्यार्थिनीनेही आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय स्वातंत्र्याविषयी चा इतिहास मांडला. तसेच यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशाला नेहमी प्रयत्नशील असते त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे व वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना पारितोषिकही प्रदान केले जाते ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व स्पर्धांमध्ये यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पेन देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.डॉ. जनार्दन कदम साहेब यांनी आपल्या भाषणात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना आवाहनही केले की, त्यांनीही भरपूर अभ्यास करून नाव लौकिक करावा व उच्चपदस्थ व्हावे. यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी उभारलेल्या शिक्षण प्रसारक मंडळा चा उद्देश म्हणजेच गोरगरीब जनतेची मुले शाळा शिकली पाहिजेत, साहेब झाले पाहिजेत अशा आठवणींना उजाळा देत शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्याही कार्याचे कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की मीही कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती या शाळेचा 1972 सालचा माजी विद्यार्थी आहे मीही गरिबीतूनच शिक्षण घेतले आहे व आज उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही भरपूर अभ्यास करा व उच्चपदस्थ बना अशा प्रकारचे आवाहन केले. जीवनामध्ये काहीही अशक्य नाही अशाही प्रकारचा संदेश देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्याचबरोबर एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना त्यांनी कायमस्वरूपी 5000 4000 व 3000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यानंतर प्रशालेचे सहशिक्षक संतोष अनगळ सर यांनी भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 व महाराष्ट्र शासनाचा 2021 चा शासन निर्णय याप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखू मुक्त राहण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवरांना देण्यात आली. शेवटी "सारे जहाँ से अच्छा" या सामूहिक गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी घोष पथक यांनी पाटीलवस्ती भागातून स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे सुसूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका. पुष्पा चेमटे मॅडम यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचे काम प्रशालेचे सहशिक्षक प्रा. महेश शेटे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेचे ग्रंथपाल सुनील कुलकर्णी, सेवक अरुण लोंढे, संतोष मुटकुळे, विठ्ठल पवार व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा