Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*सदाशिवराव माने विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* * *उत्सव तिरंगी रंगाचा आकाशाने आज भेटून घेतला* *अभिमान आहे या मातीचा ,गर्व बाळगू या भारतीय असल्याचा...*


*अकलुज ----प्रतिनिधी*

    *शकुर   तांबोळी*

  *टाइम्स  45  न्युज मराठी*

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात मोठ्या उत्साहात देशाच्या स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सागर मस्के यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष दळवी, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

 राष्ट्रगीत,ध्वजगीत, राज्यगीत यानंतर एनसीसी,आर.एस.पी, स्काऊट-गाईड या पथकांचे नेत्रदिपक संचलन झाले याचे नेतृत्व सुज्योत पंडित याने केले. यानंतर विद्यार्थ्यांच्या सामुदायिक कवायतीचे सादरीकरण झाले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांचे स्मरण करण्याच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले. आज देश जगात विविध क्षेत्रात अग्रेसर असून देशाच्या विकासात पुरुषांसोबत स्त्रियांचाही मोठा वाटा असून आज विविध मोठ्या पदांवर महिला कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो. देशाला महासत्ता बनवण्यासाठी भारताचे भवितव्य युवकांच्या हाती असून त्यांनी डॉ.अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले.

यानंतर विद्यार्थ्यांच्या लेखन शैलीला वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्व-लेखन केलेल्या भाषा भगिनी या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 'रत्नाई चषक' बुद्धिबळ स्पर्धेतील पार्थ पाटील, आदिनाथ हवाले, समीक्षा बावळे या विजेत्यांना चषकाचे व दिल्ली येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या शिवतेज जाधव यास मान्यवरांच्या हस्ते वितरण कर


ण्यात आले. 


कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सागर मस्के यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची व योगदानाविषयीची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःमधील क्षमता ओळखावी. अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जावे. असा मोलाचा संदेश दिला.  

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारे देशभक्तीपर गीत सादर झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात गीताला दाद दिली.



 या कार्यक्रमास शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. अमोल शेंडगे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा गायत्री शेटे, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे,पत्रकार, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद,भारत शिंदे, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते   

 कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या राष्ट्रगीताने झाली शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा